September 25, 2023

गरिबाच्या पोराले दारू पाजून कुटूंब उद्ध्वस्त करणार आणि तुम्ही सरपंच होणार ….

1 min read

पुणे _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ विशेष
ज्या गावात प्यायला पाणी नाही त्या गावात डजनभर दारु मिळते.प्रस्थापित लोकांनी जागा वाटून घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध काढणे म्हणजे जनतेची निव्वळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न होय. लोक अजूनही जर जात धर्म पैसा दारु मटण व वैयक्तिक फायदा.बघत बसतील तर अजून आपल्या बापच्या आणि आपल्या वाट्याला जे आले ते भविष्य काळात आपल्या मुलांच्या वाट्याला येणार आहे…!
जोपर्यंत लोकशाही पध्दतीने मतदान होत नाही..तेव्हाच तुमचा विकास होईल नाही तर भकास होणार गाव भकास मी हे कोणत्यात एका गावासाठी बोलत नाही महाराष्ट्रातील सर्व गावासाठी बोलतोय गावातील तरूणांना व्यसनाधीन,करून वाम मार्गाला लावणा-या एकाही उमेदवाराला मतं देऊ नका,पटतयं का बघा…!
मतदार बंधू-भगिनीनों विशेष करुन माझ्या युवक मित्र मैत्रिणींनो ही वेळ आहे जागं होण्याची डोळसपणे विचार करण्याची आपण आपल्या गावाचं पुढील पाच वर्षांसाठी भवितव्य निश्चित करतोय तेव्हा कुणाच्या हातामध्ये आपल्या गावचा विकास होऊ शकतो हा प्रत्येकाने जरूर विचार करावा कोण वैयक्तिक स्वार्थापेक्षा गावच्या विकासाला महत्व देईल.? कोणाकडे भवितव्यासाठी दूरदृष्टी आहे.?कोण वैयक्तीक हेवेदेवे सोडुन गावचे सर्वसमावेशक नेतृत्व करू शकतो.? कोण जात पात धर्म पक्ष तसेच कुठल्याही प्रकारच्या भावनिक मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन गावचा विकास घडवून आणू शकतो.? कोण महापुरुषांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना आपलं मानतो आणि त्यांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने आदर व अनुकरण करतो.? कोण गावच्या निधिविषयी इतंभूत माहिती जनतेपर्यंत पोहचवून पारदर्शकता दाखवू शकतो.?
एकंदर गावच्या भवितव्याचा विचार करा गाव आपलं सर्वांचं आहे कुणाही एकाची मक्तेदारी वा खासगी मालमत्ता नाहीये ह्याची जाणीव ठेवून कुठल्याही क्षणिक भूलथापांना बळी न पडता समर्थपणे निर्णय घ्या लोकशाहीला मजबूत करा व मतदान आपली जबाबदारी समजून आपलं कर्त्यव्य निश्चित पार पाडा…
*तरच लोकशाही व देश सुरक्षित*
“ज्या देशाचे मतदार नागरिक बड्या बड्या धनदांडग्या पक्षांची व मनी मसल व्यक्तींची मक्तेदारी मोडून काढत खऱ्या ज्ञानी लायक गरीबीची जान असलेल्या निस्वार्थी समाजसेवी आदर्श मानसाची आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करुन जात धर्म पंथ पक्ष न बघता निवड करत असेल तिच खरी सुज्ञ जनता, तेच खरे सुज्ञ व आदर्श मतदार आदर्श नागरिक, तरच लोकशाही व देश सुरक्षित आहे असे आपण विश्वासाने म्हणू शकू.”
“निवडणूकीच्या काळात जो पक्ष किंवा उमेदवार मतदारांना खाऊपिऊ घालत असेल पैसा वाटत असेल असा उमेदवार मतदारांना माणूस नाही तर जनावर समजत असतो हे मतदारांनी लक्षात ठेवावं.”
विकासाचं एक मॉडेल गाव घडवायचं असेल तर विचार परिवर्तन व वैचारिक विचार करणाऱ्या नागरिकांच्या बाजूने जरी आपण उभे राहीलो तरी परिवर्तनाचा पॕटर्न गावात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही..!
✍️संतोष शकूंतला आत्माराम
बादाडे –
*✒️ एक सुशिक्षित जागृत मतदार

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.