September 21, 2023

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील कुटील डाव : तळवाडे (भा)सरपंचाची नियत फिरली गावकऱ्यांची शेतजमीन स्वतःच्या नावावर केली…! जमिनीचा गैव्यवहार गोपाळराव गायकवाड यांनी चव्हाट्यावर आणला पाच वर्षे झुंज देऊन सरपंचा चा डाव हाणून पाडला

1 min read

सटाणा : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ खास प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील अनेक बाबतीत गैरव्यवहाराचे प्रकरण चवहाट्यावर येण्याचा धूम धडाका सुरू आहे ह्या धूम धडाक्यात सरपंच महाशय मागे कसे राहणार ? बऱ्याच ठिकाणी सरपंच महाशयांनी जनतेस अंधारात ठेवून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्याचा सपाटा चालविला.जर सगळ्याच गावी गोपाळराव गायकवाड सारखे निर्भिड , खंबीर नेतृत्व लाभले तर भ्रष्टाचारी सरपंचांना काळे तोंड केल्या शिवाय पर्याय उरणार नाही. नाशिक जिल्ह्यातील बागलाण ( सटाणा)तालुक्यातील तळवाडे भामेर येथील १९८६ मधील घटना तत्कालीन सरपंच कृष्णाराव रघुनाथ गायकवाड यांनी गावातील ग्रामस्थांशी खोटे बोलून त्यांचा विश्वास संपादन केला आणि अंधारातील कारभार करून गावकऱ्यांना अंधारात ठेऊन तळवाडे भामेर येथील गट न.332/2 गावकऱ्यांची शेतजमीन (खाम शेती) की जी ग्रामपंचायतीच्या नावे असते,त्यातील १५ एकर इतकी जमीन ग्रामविकास वैरण अनुदान शासना कडून मिळेल असे ग्रामस्थांना सांगून जमीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचे ठरविले असे खोटे सांगून ७/१२ उताऱ्यावर तत्कालीन सरपंच कृष्णा राव यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली.ग्रामविकास वैरण अनुदानास शासनाने मंजुरी न दिल्याने कृष्णा राव च्या कपटी ” लीला ” बाहेर पडण्यास उशीर लागलाच नाही.सरपंचाची कपटी लीला चव्हाट्यावर आणणारे खंदे आणि दमदार नेतृत्व म्हणजे तळवाडे (भा)चे प्रामाणिक शिक्षक गोपाळराव दामोधर गायकवाड यांनी गावकऱ्यांना समवेत घेऊन बागलाण तालुक्यातील नामपूर चे तलाठी, मंडळ अधिकारी,तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना सदर जमिनी बाबत पुराव्यानिशी जाणीव करून दिली. सदर जमीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचे आदेश पण सर्कल अधिकारी,तलाठी यांनी काढले होते परंतु अंमलबजावणी अंमलात येत नव्हती अखेर गोपाळराव गायकवाड यांना गावच्या भल्या साठी सलग पाच वर्षे झुंज द्यावी लागली आणि गोपाळराव गायकवाड यांच्या बाजूने निकाल जारी करण्यात आला सरपंच यांचे नाव कमी करून जमीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात आली.अर्थात गोपाळराव आणि गावकरी जिंकले सरपंचाची कपटी डाव चव्हाट्यावर आणून हाणून पाडला.सरपंच यांना चाप लावला गेला. गोपाळराव दामोधर गायकवाड हे आदर्श शिक्षक होते त्यांनी जनहित साठीच अनेक विकसित कामे केली त्यांनी बागलाण शिक्षक पतसंस्थेची स्थापना केली ह्या संस्थेचे ते आजही संस्थापक अध्यक्ष आहेत संस्थेची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची असल्याचे त्यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.