वसोळ : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी _
बजरंगवाडी (महालपाटणे) ता.देवळा येथे बजरंगवाडी क्रिकेट क्लबच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.१० रोजी या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवासेनचे महाराष्ट्र राज्य विस्तारक अविष्कार भुसे,भारतीय सैन्य दलातील जवान सागर पाटील,स्वप्निल पानसरे यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक महालपाटण्याचे माजी सरपंच अरुण पोपट अहिरे यांच्या वतीने २१ हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक मृत्युंजय प्रतिष्ठान देवळ्याचे करण आहेर यांच्या वतीने १५ हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक महालपाटण्याचे माजी ग्राम.सदस्य बापू चव्हाण यांच्या वतीने ११ हजार रुपये देण्यात येणार आहेत.या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी झाले असून स्पर्धेचा अंतिम सामना दि.२० रोजी होणार असल्याची माहिती बजरंगवाडी क्रिकेट क्लब व्यवस्थापक विजय हिरे यांनी दिली.
उद्घाटन प्रसंगी शरद ठाकरे,कैलास पाटील,महेंद्र खरोले,सागर भाटेवाल,खंडू आढाव,राहुल अहिरे समाधान अहिरे,संजू जाधव,सिधु खरोले,रोशन देवरे,विशाल अहिरे आदींसह खेळाडू उपस्थित होते.
पाहिजेत : अवघ्या दीड महिन्यात 20 हजार च्या पुढे वाचक वर्ग असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या घरा घरात आणि प्रत्येकाच्या खिशा खिशात आपली बातमी वाच्ण्या साठी लोकप्रिय ठरलेल्या ” महाराष्ट्र न्यूज ” ह्या वेब चॅनल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात आणि महानगरात पत्रकार तसेच विविध संपादक पदे भरण्यात येणार आहेत तरी इच्छुक असणारे आणि मनापासून काम करणारे,जनसंपर्क भरपूर असणाऱ्यांनी तात्काळ संपर्क करावा , संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक,महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.
