नवीमुंबईत कराराचा भंग : फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयात एकही कोरोणा ग्रस्त रुग्ण दाखल न केल्याने आयुक्तांनी बजावली नोटीस

0
32

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) वाशीतील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाला मागील नऊ महिन्यात पालिकेने शिफारस केलेल्या एकाही कोरोनव्हायरस ग्रस्त रूग्णांना दाखल करून न घेतल्या कारणाने वाशीतील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने शिफारस केलेल्या कोव्हीड -१९ ग्रस्त अशा कोणत्याही रूग्णाला दाखल करण्यास फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाने नकार दिला होता. याचा परिणाम म्हणून रुग्णालयाने पालिकेबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेचे वाशी, सेक्टर नऊ येथे १९ वर्षांपूर्वी पाच मजली सार्वजनिक रुग्णालय उभारले आहे. पालिकेच्या वैद्यकीय सुविधा पाहता शहरातील गरीब, गरजू नागरिकांना वेळप्रसंगी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी या इमारतीतील चौथ्या व पाचव्या मजल्याचे एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळ हे वैद्यकीय साखळी उभारणाऱ्या हिरानंदानी हेल्थ केअर यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. या रुग्णालयाने नंतर फोर्टिज या देशभर वैद्यकीय जाळे विणणाऱ्या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाच्या पश्चिम बाजूस अद्ययावत रुग्णालय उभारले आहे.

या रुग्णालयासाठी सार्वजनिक रुग्णालयाचा एक भाग देताना शहरातील गरीब व गरजू रुग्णाांना दहा टक्के रुग्णशय्या उपलब्ध करून देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग शिफारस करणाऱ्या गरजवंत रुग्णाला फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयात औषधे वगळता मोफत सेवा दिली जाते. मात्र मार्चपासून सुरू झालेल्या कोविड साथरोगानंतर फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने पालिकेने शिफारस केलेल्या एकाही रुग्णाला दाखल करून घेतलेले नाही. नवी मुंबई पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय तात्काळ सेवा म्हणून कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे या रुग्णालयात केवळ कोविड रुग्ण दाखल होत होते. फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयानेही कोविड रुग्ण कक्ष सुरू केले होते. याच काळात या रुग्णालयात नॉनकोविड कक्षदेखील सुरू ठेवण्यात आला होता. नवी मुंबई पालिकेने शिफारस केलेल्या एकाही रुग्णाला या रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही. त्यामुळे पालिका आयुक्त मा. अभिजित बांगर यांच्या आदेशाने या रुग्णालयाला आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here