देवळा: इलेक्शन चॉइस _देवळा तालुक्यात दिवाळीचा शुकशुकाट असणार मात्र देवळा नगरपंचायतीची निवडून जोरदार रंगणार ! १७ जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली
1 min read
देवळा : दि.१० क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज”_ भारत पवार _ यांज कडून _ नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा नगरपंचायतीची २०२० _ २५ च्या निवडणुकी साठीची १७ प्रभागांची आरक्षण सोडत आज रोजी सकाळी ११ वाजता मालेगावचे प्रांत अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात काढण्यात आली .यावेळी लहान मुलांच्या हस्ते चिठ्या टाकून सोडत काढण्यात आली १७ प्रभागासाठी हि निवड होणार असून ९ प्रभागात महिलांना तर ८ प्रभागात पुरुषांना नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे.त्यामुळे यंदाच्या दिवाळीत जनतेत शुकशुकाट जाणवणारा हा सण असून ह्या दिवाळीत अनेक सासुर वाशिन महिला आपल्या माहेरी न येता सासरी राहणेच पसंत करणार असल्याचे समजते.त्याचे कारण इलेक्शन चॉइस नसून ” कोरोना इफेक्ट ” बोलले जात आहे. त्यामुळे की काय अजून तरी देवळा तालुक्यात दिवाळीचा विशेष आनंद दिसत नाही मात्र सर्वत्र शेतीच्या कामास वेग आला असल्याचे दिसते.देवळा नगर पंचायत आरक्षण सोडत खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे – प्रभाग क्र.- १ इतर मागास वर्गीय महिला , प्रभाग क्र._ २ . अनुसूचित जमाती पुरुष, प्रभाग क्र.- 3.अनुसूचित जमाती महिला , प्रभाग क्र.४. सर्वसाधारण महिला , प्रभाग क्र.५. इतर मागास वर्गीय पुरुष, प्रभाग क्र.६. सर्व साधारण महिला, प्रभाग क्र. ७. अनुसूचित जाती पुरुष ,प्रभाग क्र.८.इतर मागास वर्गीय महिला, प्रभाग क्र.९. अनुसूचित जाती महिला , प्रभाग क्र.१०. सर्व साधारण पुरुष , प्रभाग क्र.११. इतर मागास वर्गीय महिला, प्रभाग क्र.१२. सर्व साधारण महिला, प्रभाग क्र.१३. सर्व साधारण पुरुष, प्रभाग क्र.१४. सर्व साधारण , प्रभाग क्र.१५. सर्व साधारण महिला, प्रभाग क्र.१६ . सर्व साधारण पुरुष, प्रभाग क्र.१७. इतर मागास वर्गीय पुरुष .याप्रमाणे आरक्षण सोडत असून नगराध्क्षपदासाठी चे आरक्षण आज तरी जाहीर करण्यात आले नसून ते थेट मुंबई हून जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले .
