कांदा महागाईने अधिक तिखट झाला ,गरीबाच्या घरातून पळायला लागला

0
44

 

वासोळं -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रशांत गिरासे याज कडुन

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी पिक वाहून गेलेलं आहे. अशातच जुन्या कांद्याचे भाव वाढले आहेत. नव्या कांद्याची आवक आता कमी होणार असल्याने तसेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. डिसेंबर पर्यंत कांद्याचे भाव चढे राहतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्यामुळेही भाव वाढले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सांगत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री चालू होती आता त्यात दुपटीने वाढ होऊन नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये तर जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळत आहे.
दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे.

मार्केटमधील व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले की, नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. रविवारी केवळ 300 पोती नवीन कांद्याची आवक झाली. डिसेंबर महिन्यात चांगल्या नवीन कांद्याचे पिक बाजारात येईल. तोपर्यंत भाव चढेच राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here