मालेगावच्या शांततेत मीठाचा खडा कमलाकरने टाकला, कमलाकर पवार ला दोन दिवसात अटक करा अन्यथा आर.पी.आय.रस्त्यावर उतरणार – ईशारा

0
84

भारत पवार  : मुख्य संपादक                      आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क मो. ९१५८४१७१३१.                                           मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : कमलाकर पवारला अटक झालीच पाहीजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मालेगांव शहर व तालुका रिपब्लिकन एप्लाॅईज फ़ेडरेशन कामगार युनियन मालेगांव रस्त्यावर उतरेल असा ईशारा आर.पी. आय.( आठवले गट) च्या नेत्यांनी दिला आहे.दरम्यान मालेगाव त्रिरत्न मंडळ तर्फे येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.निवेदनात कमलाकर पवार यास अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. भारतरत्न तथा संविधान चे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून मालेगावच्या शांततेत मीठाचा खडा टाकून शांततेचा भंग करणाऱ्या कमलाकर पवार यास अटक न झाल्यास मालेगावची जनता रस्त्यावर उतरणार असा ईशारा आर.पी.आय.(आठवले  गटाच्या) च्या नेत्यांनी यावेळी दिला.मालेगाव शहराची ओळख म्हणजे  अतिसंवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.ह्या शहरात आज पर्यंत अनेक जाती ,धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात.मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी अपशब्द वापरून मालेगावच्या शांततेत मीठाचा खडा टाकून शांततेस गालबोट लागले आहे.त्यामुळे कमलाकर पवार यास वेळीच अटक न झाल्यास  गरम मसाला पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याचे मत आर पी आय नेत्यांनी यावेळी व्यक्त केले.
संबंधित आरोपी हा सधन कुटुंबातील प्रतिष्ठित राजकारणी तसेच शिक्षण संस्थेचे स॑स्थापक आहे त्यामुळे संबंधित आरोपीला स्थानिक पोलीस अभय देत नाही ना?ही सर्व आंबेडकरी समाजाच्या मनात शंका आहे अधीच मालेगांव शहर हे अति संवेदनशील शहर म्हणुन ओळखले जात असुन अशा शहरात अशा प्रकारच्या विघ्नसंतोषी समाजक॑टकाकडुन दोन समाजात तेढ निर्माण केली जात असुन गावाचे वातावरण बिघडवण्याचे काम होत आहे .
संबंधित आरोपीला लवकरात लवकर अटक झालीस पाहीजे दोन दिवसात अटक न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .
या वेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष.मा.दिपकभाउ निकम , जिल्हाकार्योध्यक्ष मा.सुनिलभाऊ यशोद, रिपब्लिकन एप्लाॅईज फ़ेडरेशन कामगार युनियन अध्यक्ष  मा.सुदेशजी वाघ,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष.,वाल्मिकराव सोनवणे, दादाजी महाले, तालुकायुवाकार्याध्यक्ष किरण पगारे,आनंद यशोद, विष्णु शेजवळ आनंद गा॑गुर्डे ,न॑दाआण्णा कापडणे,आशिष आहीरे , सुभाष धिवरे, सुनिल शिन्दे, विनोद जाधव,राजु खेडकर, सुभाष आहीरे,राजु वाघ,भिवसन मोहीते, अनिरूद्ध आहीरे, आनंद खैरनार, राजेश पटाईत, मधुकर भालेराव,देवा बिर्हाडे,आकाश निकम, समाधान पवार, कार्यकर्त उपस्थित होते ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here