महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मालेगावी निर्भय वॉक
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. मो.९१५८४१७१३१

मामालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पद्मश्री डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने दरवर्षी निषेध म्हणून मूक रॅली काढली जाते.
सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या संख्येने महिला व तरुणी उपस्थित होत्या.
डॉ नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचे मारेकरी व मास्टर माईंड अजूनही सापडत नाही. हे खरे पाहता सरकारचे अपयश आहे. सोबतच कलबुर्गी, कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश अशा अनेक पुरोगामी विचार मांडणाऱ्या विचारवंत लेखकांच्या हत्या नियोजित पद्धतीने घडवून आणण्यात आल्या आहेत. अशा हत्या थांबाव्यात लोकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य व विचारप्रणाली पोहोचावी तसेच सरकारला देखील या दिवशी जाब विचारला जावा आणि झोपलेल्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी मॉर्निंग वॉक चे आयोजन करण्यात येते. सत्यशोधक मैदान,संगमेश्वर ते एकात्मता चौकापर्यंत निर्भय वॉक रॅली काढण्यात आली.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे मार्गदर्शक व माजी अध्यक्ष ताऊभैय्या परदेशी, राजेंद्र भोसले यांच्या समवेत समितीचे अध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा कार्यवाह रवींद्र आहिरे, कार्याध्यक्ष रोहित तेली, सचिव योगेश बागुल, तालुका कार्यवाह डॉ. संदीप खैरनार, अभिजित सोनपसारे, महिला सदस्य नम्रता जगताप, तुलसी मोरे उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उमेशबापू अस्मर, राष्ट्र सेवा दलाचे रविराज सोनार, विलास वडगे, प्रवीण वाणी, नचिकेत कोळपकर, सोमनाथ वडगे, नरेंद्र बच्छाव, किरण शेवाळे, जसवंत माळी, अरविंद पवार अमित सरग, मोतीराम पानपटील, संजय जाधव, राकेश माळी, राजेंद्र पगारे, संजय जोशी, डॉ एस. के. पाटिल ,शाम शिंपी
आदी उपस्थित होते.