आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१
देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील अग्रगण्य आणि ग्राहकांना वेळेत व चांगल्या सुविधा देणाऱ्या श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्थेस वार्षिक सर्व खर्च वजा जाता एक कोटी ४५ हजार ६५५ रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.रमनलाल सुराणा यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.यावेळी उपाध्यक्ष डॉ.जगदीश धामणे ,संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा उपस्थित होते. पतसंस्थेच्या कारभारा विषयी सविस्तर माहिती देताना डॉ.सुराणा यांनी सांगितले की ,मार्च २०२२ अखेर २ कोटी ३३ लाख ४७ हजार इतका विक्रमी निव्वळ नफा झालेला आहे परंतु वर्ष भरातील सर्व खर्च वजा जाता संस्थेस १ कोटी, ४५ हजार, ६५५ रुपये इतका निव्वळ नफा शिल्लक आहे.संस्थेचे अधिकृत भागभांडवल २ कोटी ५० लाख रुपये असून वसूल भाग भांडवल २ कोटी ,८ लाख ७७ हजार ४०० रुपये इतका आहे. विविध प्रकारचा १८ कोटी ३२ लाखाचा निधी संस्थेकडे जमा आहे.नुकताच ठेविंचा ५० कोटींचा टप्पा ओलांडला असून संस्थेकडे ५० कोटी ३६ लाखाच्या ठेवी जमा आहेत.चालू वर्षी संस्थेच्या कर्ज वाटपकरण्यात ५ कोटी २९ लाख रुपयांची विक्रमी वाढ झालेली असून एकूण कर्ज वाटप संख्या २८ कोटी १७ लाख ५५ हजार इतकी आहे. सी.डी. रेशोन ९ टक्के वाढ होऊन तो ३७.०८ टक्के इतका आहे. नेट एनपीए ० टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच आपल्या पतसंस्थेने विविध बँकांमध्ये व सेंट्रल गव्हर्मेन्ट सिक्युरिटी मध्ये ४० कोटी ५३ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कोरोनाच्या सावटातून अजून सर्वजण सावरलेले नसतानाही गत वर्षाच्या तुलनेत थकबाकी मध्ये ०.४४ टक्के इतकी अत्यल्प घट झालेली आहे मार्च अखेर संस्थेची निव्वळ थकबाकी २.६६ टक्के इतकी अत्यल्प राखण्यात यश आले असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी संचालक रमेश संकलेचा,प्रदीप सुराणा, हरकचंद ओस्तावाल,ईश्वर सुराणा, धरमचंद संचेती,सुभाष सोनवणे,राजेंद्र सुराणा,डॉ.भूषण कर्नावट, जनार्दन शिवदे,संजय कानडे,संचालिका सुशीला सूर्यवंशी, सुरेखा सुराणा,व्यवस्थापक महेश जोशी व कर्मचारी उपस्थित होते.
