कायाकल्प जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार दिंडोरी तालुक्यातील तळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळाला, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारला

0
31

 

 

  • वासोळ_ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ विशेष _
    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिं. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हास्तरीय कायाकल्प सन २०१९ /२० चा प्रथम पुरस्कार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दिंडोरी पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर ,जि.प.सदस्य भास्कर भगरे ,अशोक टोंगारे ,पंचायत समिती सदस्य बेबि सोळसे ,दिंडोरी नगरपंचायतीचे मुख्यधिकारी नागेश येवले ,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुजित कोशिरे , तळेगाव सरपंच अजय चारोस्कर ,उपसरपंच पुष्पाताई पालवे ,ग्रा.पं.सदस्य गोकुळ चौधरी ,चंद्रभान चौधरी ,पुंजाराम पिलवे ,राजेंद्र गोसावी ,संतोष निंबाळकर ,सागर चकोर ,आदी उपस्थित होते .सदर कार्यक्रमात आशा सेविकांचा कोविड योध्दा म्हणुन विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ व पंचायत समिती सभापती,पंचायत समिती सदस्य जि.प.सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी डाॅ.भारती चव्हाण ,डाॅ.लिना भालशंकर ,व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व ग्रा.पं.पदाधिकारी ,व कर्मचारी यांनी सहकार्य केले .सुञसंचालन व आभार सुनिल देवकर यांनी केले.
  • **संपूर्ण महाराष्ट्रात वाचले जाणारे महाराष्ट्र न्यूज साठी बातम्या व जाहिराती संपर्क करा : संपादक , भारत पवार ,संपर्क – मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here