भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१. देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : रविवार दि. १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण आणि विशेतः बाजाराचा दिवस असल्या कारणाने देवळा येथे नागरिकांची भरगच्च गर्दी पहावयास मिळाली. गर्दीचा उच्चांक गाठल्याने खाकी वर्दी सुद्धा अगदी चोख कर्तव्य बजावत असल्याचे दिसले. त्यामुळे दिवसा तरी नागरिकांना चोरांपासून भय मुक्त असल्याचे जाणवले. एकूणच येथील पोलिसांना कसरतच करावी लागली असेच म्हणावे लागेल. अगदी शांततेत दिवस मावळला आणि पोलिसांनी सुद्धा काहीसा सुटकेचा श्वास सोडला. पण कसले काय ? पोलिसांना कुठे सुटकेचा श्वास सोडता येतो काय ? बाजार जरी संपला पण यात्रा संपली नव्हती . त्यामुळे पोलिसांच्या डोक्याला ताण तर चोरांची मात्र ठरली शान याप्रमाणेच अघटीत घडले.
अक्षय तृतीया असल्या कारणाने दरवर्षी देवळा शहरात दुर्गा देवीची यात्रा उत्सव साजरा होतो आणि याच दिवशी रात्री तमाशा सुद्धा असतो.त्यामुळे यात्रेला उत्साही प्रेमींचा उत्साह अगदी दाटून येत असतो. यावेळी महिलांच्या गर्दीने मात्र उच्चांक गाठलेला दिसून आला.महिला आपल्या लहानग्यांसह देवी दर्शनाला रांगेत उभे राहून दर्शन घेत होते याच वेळी चोरांनी गर्दीचा फायदा घेत आपली चलाखी दाखवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता २५ ते ३० महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने, मनी, मंगळसूत्र चोरांनी लंपास केल्याने येथील देवीच्या यात्रेस मोठा गालबोट लागल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातवरण पसरले तर पोलिसांना सुद्धा चकित झाल्या सारखे झाले.अगदी काही मिनिटात ३० तोळे सोने चोरीस गेल्याचे महिलांच्या लक्षात आल्याने महिलांनी आणि पुरुषांनी मंदिर सोडून पोलिस ठाण्यात एकच गर्दी केल्याने पोलिस ठाण्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे रात्रीच्या गर्दी वेळेचा सुरक्षेचा प्रश्न ऐराणीवर आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे देवळा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे. यानिमित्ताने का होईना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांची कुमक वाढविण्यात लक्ष घालावे अशी देवळा आणि तालुक्यातील नागरिकांनी मागणी केली आहे.
दरम्यान ज्या_ ज्या महिलांचे गळ्यातील दागिने चोरीस गेले त्यांचे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
देवळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नंदा पाटील व पोलिस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.






