भारत पवार :राज्यमुख्य संपादक : ९१५८४१७१३१
मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आश्रयआशा फाऊंडेशन व-हाणे संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बहुचर्चित राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार सन्मान सोहळा २०२६ या भव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आता सर्वांचे लक्ष २५ एप्रिल या दिवसाकडे लागले आहे. महाराष्ट्रभरातील मान्यवरांच्या स्वागतासाठी मालेगाव महानगर सज्ज झाले असल्याची माहिती पुरस्कार समितीचे आयोजक तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे यांनी दिली.
मालेगाव येथील हरिकेश लॉन्स बँक्वेट हॉल, दाभाडी रोड, दौलती शाळेजवळ हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून आदिवासी लोकसंस्कृती रक्षक यथार्थ चिंतामण देशमुख तसेच बाल नृत्यांगना कु. अनन्या चौरे यांचा पारंपरिक आदिवासी नृत्याविष्कार सादर होणार आहे. यासोबतच तलवारीबाजीचे थरारक प्रात्यक्षिकही मान्यवरांना पाहायला मिळणार आहे.
याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य रक्षणासाठी वापरण्यात आलेल्या दुर्मिळ शिवसाहित्य वस्तूंचे अनोखे प्रदर्शन कार्यक्रमस्थळी भरविण्यात येणार असून, इतिहासप्रेमींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या सोहळ्यास राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, धुळे, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक आदी जिल्ह्यांतील पुरस्कारार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या भव्य-दिव्य सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी आश्रयआशा फाऊंडेशन व युवा मराठा महासंघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे रामभाऊ आवारे यांनी सांगितले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या कार्यक्रमामुळे मालेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान मान्यवर पुरस्कार्थींचे महाराष्ट्रभरातून भरपूर प्रतिसाद लाभल्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून सुमारे ५०० मान्यवरांनी संपर्क साधून आमच्यावर प्रेम व विश्वास व्यक्त केला. परंतु नियोजित १६२ पुरस्कार्थींची निवड करण्यात आली असून वेळे अभावी अन्य पुरस्कार्थी निवड न करता त्यांना पुढील कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र राऊत पाटील यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले. त्यामुळे नाराज न होता आपले असेच सहकार्य व प्रेम आमच्यावर कायम असू द्या असेही राऊत पाटील यांनी यावेळी सांगितले. तर आमच्यावर भरभरून प्रेम करून आम्हास सहकार्य केल्याबद्दल सर्व मान्यवर पुरस्कार्थींचे तसेच पुढील नियुक्त केले जाणारे पुरस्कार्थींचेही जाहीर आभार व ऋणनिर्देश राजेंद्र राऊत पाटील यांनी व्यक्त केले.





