भारत पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१
देवळा : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : इंग्रजी साहित्याचे महान लेखक व कवी विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्त एस.के.डी. इंटरनॅशनल स्कूल भावडे,येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधीर सोनवणे,सर्व विभाग प्रमुख यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे व विल्यम शेक्सपियर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन,हारपुष्प अर्पण करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वेलकम डान्स,पार्ट ऑफ स्पीच ऍक्टिव्हिटी,अल्वेज विन्स नाटक,आय एम सो हॅपी डान्स,फॅन्सी ड्रेस ऍक्टिव्हिटी, अंटोनिम्स अँक्टिव्हिटी, प्रेपोझिशन ऍक्टिव्हिटी,शेअरिंग अँड केअरिंग ऍक्टिव्हिटी,टाइप ऑफ सेन्टेन्स ऍक्टिव्हिटी, टेन्स सॉंग,रोल प्लेइंग फ्रॉम लिटरेचर, टीचर्स गेम,चार्ली चॅपलीन मेसेज टू ह्यूमन,अब्राहम लिंकन मेसेज टू सन, स्पेल बी स्पर्धा,फायरलेस फूड स्पर्धा, लॅप बुक मेकिंग स्पर्धा,मास्क मेकिंग स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा,चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे विद्यार्थी दीपक गुजरे,अभिराज सावंत,आदींनी पाटील,राजमुद्रा निकम,श्रावणी आहेर व काव्य सावकार यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी इंग्रजी विषय विभाग प्रमुख कावेरी पवार,सदस्य रूपाली ठाकरे,रजनी आहेर,केजल पाटील,रूपाली मोरे,किरण कापडणीस यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक राहुल पाटील,विकास शिंदे संगीतशिक्षक रतन भोईर, ललिता सोनवणे,क्रीडा शिक्षक मुदस्सर सय्यद,ययाती जाधव किरण चव्हाण,मंजुषा शेवाळे, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यशस्वीरीत्या पार पडलेल्या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य एस.एन.पाटील,संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे,सेक्रेटरी मीना देवरे यांनी शुभेच्छा दिल्या.





