पाकिस्तानचा धुवा साफ भारतात खरी दिवाळी जल्लोषात ,जिंकण्याची सवय आहे …टीम इंडियाचा अभिमान आहे… वर्ल्डकप भारताच्या ताब्यात तर विराट चे देशातून विराट अभिनंदन

0
39

दीपावली जाहिराती साठी आणि बातम्या साठी संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज ” 9158417131

मेल्सबर्न : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मेल्सबर्न मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या वित्त्तथरारक सामन्यात टीम इंडियाने कमाल दाखवत पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला.आणि वर्ल्ड कप आपल्याकडे आणल्याने भारतात खरी दिवाळी जल्लोषात साजरी केली जातेय.भारताचा विजयाचा खरा नायक ठरला तो विराट कोहली.त्याने 53 चेंडूत 82 धावा केल्या आणि सामन्याचे चित्रच पालटले.प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या.त्यामुळे हा सामना मर्म भेदक होणार आणि इंडियाची अवस्था काय होणार ? अशी भेदक कल्पना भारताचे दर्शक करत होते.टीम इंडियाने आपली मर्मभेदक खेळी दाखून  6 विकेट गमावून विजय आपल्याकडे खेचून आणला.यावर राजकीय नेत्यांनी विजयाचा आनंद साजरा करताना प्रतिक्रया सुद्धा व्यक्त केल्या.एकीकडे टीम इंडियाच्या विजयाची सर्वत्र चर्चा झडत असताना दुसरीकडे राजकीय सर्कल मध्येही या विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.टीम इंडियाच्या या विजयी कामगिरीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले की खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू झाली असून T 20 विश्वचषक सुरू करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.विराट कोहली ने काय खेळी खेळली आहे ,जबरदस्त.संपूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन.असे ट्विट शहा यांनी केले.तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करताना म्हटले की ,…. जिंकण्याची सवय आहे…टीम इंडियाचा अभिमान आहे… दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की काय अप्रतिम सामना होता विराटच्या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने पाकिस्तान विरुद्ध शानदार विजय मिळविला .तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी गोव्यातील कॅथोलीक विद्यापीठात एका परिषदेला संबोधित केल्यानंतर ट्विट केले भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी माझे विमान सोडले पण सामना सोडला नाही.अशा प्रतिक्रया विविध राजकारणी नेत्यांनी व्यक्त केल्या.भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची चांगली कामगिरी करून टीम इंडियाने भारतातील नागरिकांना दिवाळीतील खास गोड भेट देऊन आता खरी दिवाळी जल्लोषात साजरी होतेय अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली असून खेळाडू विराट कोहली ने खूपच उत्कृष्ट कामगिरी करून विजय खेचून आणला त्यामुळे संपूर्ण टीम सह विराट चे विराट अभिनंदन केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here