कामात हलगर्जीपणा झाल्यास आत्मदहनाचा बीडीओ यांना थेट ईशारा

0
53

जाहिरात आणि बातम्या साठी थेट संपर्क करा , काही सेकंदात संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ” महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील पंचायत समिती काहीना काही आरोपांनी नेहमीच आघाडीवर आहे.ह्या पंचायत समितीच्या म्होरक्यास अर्थात गटविकास अधिकारी ( बिडीओ ) यांना निर्णय देण्यास उशीर का लागतो हेच कळेनासे झाले आहे कारण संबंधित तक्रारदारांनी तक्रार केल्यास त्या तक्रारीची चौकशीची दखल गटविकास अधिकारी प्राधान्याने घेतात आणि तक्रारीत तथ्य आढळल्यास मात्र पुढील कार्यवाही करण्यात का कसूर होतो ? की मिली भगत ? होते की काय अशी शंका येत असते त्यामुळे संबंधित तक्रारदारांना आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागतो.एवढे कमी पडते म्हणून की काय ? चक्क आत्मदहनाचा इशारा गटविकास अधिकारी यांना दिला जातो.त्यामुळे गटविकास अधिकारी यांच्या कामकाजात ढिलाई पणाचा आव का असावा असा सवाल जनतेने व्यक्त केला आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी वऱ्हाणे गावी नेमणुकीस असलेल्या ग्रामसेविका सुवर्णा साळुंखे कर्तव्यात दोषी आढळल्याने त्यांचेवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी,शिवाय जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तो पर्यंत त्यांची नेमणूक कोणत्याही ग्रामपंचायतीत करू नये या मागण्या साठी आमरण उपोषण छेडले होते.परंतु लेखी आश्वासन दिल्यामुळे राऊत पाटील यांनी आमरण उपोषण अधिकाऱ्यांच्या लेखी वरती विश्वास ठेवून मागे घेतले.ह्या लेखी आश्वासनाची पूर्तता अद्याप पावेतो झालेली नसल्याने कारणाने आता थेट राजेंद्र पाटील राऊत यांनी २८ ऑक्टोबर २०२२ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर ११ ते ५ ह्या वेळेत आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे अप्पर जिल्हाधिकारी,मालेगाव,तहसीलदार ,मालेगाव,गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव , कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव यांना दिले आहे.गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात ? कोणती युक्ती शोधून राऊत पाटील यांना न्याय देतात की ग्रामसेविका साळुंखे यांना अभय देण्यात धन्यता मानतात याकडे मालेगाव वासियांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here