मालेगाव : ठेकेदाराचे धोरण मनपा कर्मचाऱ्यांचे मरण…! समस्यांच्या विळख्यात मनपा

0
41

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : 9158417131 

मालेगाव : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल अँड न्यूज पेपर : ऐन दिवाळीच्या तोंडावर मालेगाव मनपा ठेकेदार पद्धतीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन छेडावे लागले.त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.येथील मनपा आरोग्य विभागातील ठेका शेवाळे नामक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला.तेव्हा पासून आज पर्यंत कुठल्याही विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय न देता अन्यायच करत गेल्याचे ठेका कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.त्यामुळे अन्यायास वाचा फोडू न्याय मिळविण्यासाठी  त्यांनी काम बंद आंदोलन छेडले.यामुळे नागरिकांना भयानक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.दिवाळी सणासुदीच्या दिवसांत सर्वत्र स्वच्छता मोहीम राबून नागरिकांना प्रसन्न वाटेल असे वातावरण मनपा तर्फे निर्माण केले जाते.परंतु यावर्षी कर्मचाऱ्यांसह समस्त नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तर मनपास समस्यांचा विळखा पडला आहे.या सर्व समस्यांना जबाबदार शेवाळे आणि अन्य ठेकेदार जबाबदार असल्याचे बोलले जात असून सदरचा ठेका बंद करावा अशी काहीशी मागणी नवनियुक्त  आर.पी.आय.ग्रा.जिल्हा अध्यक्ष भारत जगताप ,तालुका अध्यक्ष दिलीप अण्णा अहिरे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी आयुक्त. गोसावी यांना समक्ष भेटून निवेदन देऊन करण्यात आली आहे.

येथील मनपा गटार कामगार,झाडू कामगार,आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे ठेका पद्धतीने कर्मचारी नेमून काम करत असते.जसा ठेका सुरू झाला तसे कर्मचाऱ्यांना पगार कमी देणे तो सुद्धा वेळेवर न करणे यासारख्या समस्यांना कर्मचाऱ्यांना कायम सामोरे जावे लागत होते.सदरच्या सर्वच कर्मचाऱ्यांना दरमहा १८०० रू.पगार अदा करण्याचे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.तसे न करता सर्वच ठेका कर्मचाऱ्यांना महिना भर काम करून फक्त ५००० रू.हाती टेकवले जायचे त्यामळे ठेकेदाराचे धोरण म्हणजे कर्मचाऱ्यांचे मरण असून ठेदरांची चांगलीच चांदी आहे असे येथे कर्मचारी वर्ग संतापाने म्हणत आहेत.त्यामुळे हा संतापाचा उद्रेक होऊन केमचाऱ्यानी दिवाळी सणासुदीच्या दिवसांत काम बंद आंदोलन सुरू केले आणि रहिवाश्यांना नको त्या समस्यांना सामोरे जावे लागले. प्रभागातील गल्ली गल्लीतील गटारी घाणीने माखल्या आहेत तर सर्वत्र घाणीने उग्र रूप धारण केले आहे. शौचालयात घाणीने आपले प्रस्थ वाढवले आहे.कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आज रोजी काहीसा तोडगा निघून  काम बंद आंदोलन जरी समाप्त झाले तरी मात्र वरील समस्या ह्या आजही कायम आहेत.त्या शक्य तितक्या लवकर मिटविण्यासाठी मनपाने तातडीने पाऊले उचलण्याची गरज आहे.ठेकेदार पद्धतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सद्या ९५०० रू पेमेंट देण्याचे मान्य केले असेल तरी हे पेमेंट कमीच असल्याचे बोलले जात आहे.कारण सदर ठेकेदारांनी १८००० रू.देणे गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजी पसरली असली तरी काहीसे आनंद ही पसरला असल्याचे सांगितले जात आहे.असे असले तरी मनपा मात्र आजही समस्यांच्या विळख्यात आहे हे मात्र रहिवाशी बोलत आहेत.याकडे मनपा आयुक्त गोसावी यांनी लक्ष देऊन आपली जबाबदारी पार पाडून मनपास समस्यांच्या विळख्यातून बाहेर काढावी आणि रहिवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here