आर. पी. आय.नाशिक जिल्हा प्रमुख पद पुन्हा डॅशिंग नेतृत्वाकडे ,जिल्ह्यात विकासपर्व आणणार : जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे ” महाराष्ट्र न्यूज ” तर्फे लोंढे साहेबांचे जोरदार स्वागत..आज जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवडी साठी बैठक

0
105

भारत पवार : मुख्य संपादक : महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मना मनात काही सेकंदात   आपली जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क करा .” महाराष्ट्र न्यूज “वाचक संख्या : 91974 +           नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : आर.पी.आय.(आठवले) ह्या राष्ट्रीय पक्षाची पूर्वीची संपूर्ण कार्यकारणी व पदाधिकारी ना.आठवले साहेब यांनी बरखास्त केली होती. आता पुन्हा नव्याने देशभरात ह्या पक्षाचे नवीन जिल्हाध्यक्ष पदाधिकारी केंद्रीय मंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये नियुक्त करण्यात येत आहेत.त्यानुसारच आर.पी.आय.(आठवले) गटाची नाशिक जिल्ह्याची धुरा अर्थात जिल्हा प्रमुख म्हणून नव्याने पुनश्च डॅशिंग नेतृत्व असलेले आमचे जुने सहकारी मा.प्रकाशजी लोंढे यांचे कडे रीपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये सोपविली गेल्याने महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक/ संचालक भारतराज पवार यांनी  लोंढे साहेबांचे जोरदार स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. गेल्या काही काळा पासून जिल्ह्यातील काही तालुके वगळता आर.पी. आय.पक्षात अनास्था दिसून येत आहे.ती अनास्था आणि कार्यकर्त्यात असलेली मरगळलेली अवस्था आमचे डॅशिंग नेतृत्व असलेले लोंढे साहेब नक्कीच दूर करून जिल्हाभरात सर्व तालुक्यात विकास पर्व नक्कीच आणतील अशी अपेक्षा मुख्य संपादक पवार यांनी यावेळी व्यक्त केली.आजच्या घडीला पैसा महत्वाचा नसून पदाधिकाऱ्यात आणि कार्यकर्त्या माणुसकी महत्वाची आहे.म्हणून पक्ष चालवायचा असेल तर घमेंड महत्वाची नसून माणुसकी महत्वाची आहे.तसे पाहिले तर लोंढे साहेबांना काहीच कमी नाही सगळच ऐश्वर्या त्यांच्यापाशी लोटांगण घालते. हे सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे.तरी सुद्धा लोंढे साहेबांनी माणुसकी सोडली नाही.मधमाशीच्या पोळ्या प्रमाणे त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमवलीत त्यामुळे मला लोंढे साहेबांचा गर्व आहे.असेही भारतराज पवार यांनी म्हटले आहे. असेच बॉस लोंढे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारा खरा कार्यकर्ता आणि बागलाण तालुक्यातील मुख्य पदाधिकारी बापुराज खरे यांनी मोठी मेहनत घेऊन कार्यकर्ते कमावले एवढेच नाही तर ब्राह्मणगाव येथील गावचे उपसरपंच पदी नियुक्ती होताच त्यांनी गावात विकास कामांचा आलेख वाढता केला.त्या बरोबरच बागलाण तालुक्यात आर.पी.आय.ची ताकद वाढविण्यावर त्यांनी मोठा भर दिला.असे सांगून मालेगाव महानगरातील उमलत नेतृत्व राहुलजी पवार यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आर.पी. आय.पक्ष हा समाज मर्यादित न ठेवता अन्य समाजात पोहचविण्याचे काम त्यांनी केल्याचे समजले.त्यामुळे मला ह्या लेखात राहुलजी यांचा उल्लेख आवर्जून करावा लागला.तर अनेक ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप अण्णा अहिरे यांचे सह बरेच जुने सहकारी ( सगळ्यांची नाव घेणे शक्य नाही )यांनी आर.पी.आय.साठी योगदान दिलेले आहेच आणि देत आहेत परंतु विकास पर्व दिसत नाही ते आता लोंढे यांच्या डॅशिंग नेतृत्वाने आणणारच असा विश्वास संपादक भारत पवार यांनी व्यक्त केला.                                                    जिल्ह्यातील बरखास्त केलेली कार्यकारणी पुन्हा नव्याने जिल्हा कार्यकारणी व अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी उद्या मंगळवार दि.२७/९/०२२ दू.१:०० वाजता बिगसिटी हॉटेल ,बॅकवेट हॉल, प्रसाद सर्कल ,गंगापूर रोड नाशिक येथे बैठक आयोजित करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

महाराष्ट्र न्यूज वाचक संख्या : 91974 +.                      संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत इच्छुक असलेल्या युवक युवतींनी संपर्क करावा.  संपर्क : मुख्य संपादक :मो.9158417131

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here