पिंपळगावबसवंत टोलनाक्यावर दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी ,त्यातील एक पोलीस पत्नी दुसरी टोल कर्मचारी
1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : जाहिराती व बातम्या साठी संपर्क : 9158417131

पिंपळगाव बसवंत : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलासराव गडाख : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील कर्मचारी नेहमी या ना त्या कारणाने भांडणात आघाडीवर असतो.त्यामुळे ह्या टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचा उर्मट पना त्यांची अरेरावीची पद्धत तर किरकोळ कारण घडले तरी शिवीगाळ,हाणामारी पर्यंत मजल ह्या कर्मचाऱ्यांची गेल्याने त्यामुळे अख्या महाराष्ट्रभर हा टोल नाका आणि तेथील कर्मचारी गाजतायत म्हणूनच आता येथील कर्मचाऱ्यांना सुसंस्कार लावणे गरजेचे झाले आहे. आता पुन्हा एकदा पिंपळगाव टोलनाका चर्चेत आला आहे.या टोल नाक्यावर दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
दरम्यान,पिंपळगाव टोलनाका येथून कारने जाणारी एक महिला आणि टोलनाका महिला कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. मात्र थोडयाच वेळात या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. परिस्थिती अशी निर्माण झाली की एकमेकांना भिडणाऱ्या महिला कुणालाही न जुमानता केस पकडून भांडत होत्या.
हे भांडण बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दी जमल्यानंतर भांडण सोडवण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू होते. मात्र या दोघींनी एकमेकींचे केस इतके घट्ट पकडून ठेवले होते की दोघींनाही आवरता येत नव्हते. शेवटी दोघा तिघांनी मिळून या महिलांचा बाजूला केले. मात्र तदनंतर देखील एकमेकांना शिव्या देत होत्या. हे भांडण एवढे रंगले की अनेकांनी त्यांचा व्हिडीओ काढला. आता ह्या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान, त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुणे येथे जात होते. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असे सांगितले. यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महिलेत जोरदार हाणामारी झाली.