महाराष्ट्रातील आमदारांची पळवापळवीत पोलीस यंत्रणा अटेंशन झोन मध्ये

0
45

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : परखड ,निर्भिड , सडेतोड बातम्यांसाठी व जाहिराती साठी निसंकोचपणे संपर्क करा. मो. 9158417131.

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर : भारत पवार ,याज कडून : महाराष्ट्राचे राजकारण सध्या खूपच ढवळून निघाले आहे.त्यामुळे राजकारणातील अनेक नेते अस्वस्थ झाले आहेत.गेली अडीच वर्ष राजकारणात अर्थात महविकास आघाडी सरकार मध्ये सर्व काही अलबेल चालू होते. परंतु महाराष्ट्रातील  राजकारण हे डिजिटल ” जमाना” प्रमाणे झाले आहे.कारण केव्हा त्यात तांत्रिक बिघाड होईल हे सांगता येत नाही.त्याचप्रमाणे सध्याचा बिघाड झाला आहे.सत्ते साठी कोण काय करणार याचा भरोसा नाही .येवढे मात्र नक्की जनहित साठी लढा कोणीच देत नाही हे मात्र नक्की.शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड पुकारले आणि सुरत मुक्कामी राहून गुवाहाटी रवाना झाले.सोबत ३५ हून अधिक आमदार असल्याचे सांगितले जाते आहे.अशा प्रकारे राजकारणाची वाताहात होत असताना ,आमदारांची पळवापळवी होत असताना महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा मात्र अटेंशन ( सावध ) भूमिकेत आहे.कारण शिंदेंच्या बंडा मुळे राजकारण ढवळून निघाले असल्याने ते गढूळ पाण्या सारखे झाले आहे.महाराष्ट्रात केव्हा काय होणार ? अशी अवस्था निर्माण झाल्याने पोलिसांना केव्हा काय आदेश प्राप्त होतील याचा मात्र नेम नाही त्यामुळे संपूर्ण पोलीस दल अटेंशनच्या (सावधानतेच्या) भूमिकेत आहे.महाराष्ट्रात सरकार कोणाचे असणार याचा हुबेहूब अंदाज पोलिसांनी सुद्धा नसल्याने सावध राहण्याची मोठी डोके दुखी पोलीस आणि अधिकाऱ्यांची झाली आहे.राजकारण्याच्या सावळा गोंधळ मुळ जनतेची हानी होते.कारण जनहिताचे निर्णय न घेता स्वहित साधण्यासाठी राजकारण्यांची मोठी पळापळ चालू असते.त्यामुळे सर्वत्र अस्थिरता निर्माण होते.महाराष्ट्रातील राजकारणातील  अस्थिरता आणि झालेली खळबळ येत्या ९० तासात संपणार असल्याचे बोलले जात आहे. तर धनुष्यबाण करीता चालू केलेली लढाई कायदेशीर लढा देऊन ” धनुष्यबाण ” कोण उचलणार ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ? याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.याबाबत चर्चेस मोठा ऊत आला आहे.

नॉटरिचेबल दादा भुसे मात्र …..

हाती आलेल्या वृत्ता नुसार काल पर्यंत नॉट रीचेबल असलेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे हे मात्र गुवाहाटी येथे पोहचल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.एकनाथ शिंदे आणि दादा भुसे हे पूर्वी पासून एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले जात असून धर्मवीर कै.आनंद दिघे यांचे नेतृत्व मानणारे हे दोघं नेते होत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here