चांदवड तालुक्यातील जवान अर्जुन गांगुर्डे यांना वीरगती,मुलांच्या विवाह सोहळ्या पासून दुरावले…तालुक्यात शोककळा

0
73

चांदवड : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल अँड न्यूज पेपर : नेटवर्क : तालुक्यातील कळमदरे येथील अर्जुन तुकाराम गांगुर्डे (५१) हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात  (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले ओडिशा राज्यातील शहरकिल्ला येथे कर्तव्य बजावत असताना अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचार चालू असताना निधन झाले.जवान गांगुर्डे यांच्या निधनाची बातमी गावात पसरताच तालुक्यात शोककळा पसरली. गेल्या महिन्यात ते गावी सुटीवर आले होते.लग्नसराईचे दिवस असल्याने त्यांनी अनेक लग्न समारंभ पार पाडली.परंतु त्यांना अचानक वीरगती प्राप्त झाल्याने स्वतःच्या मुलांच्या विवाह सोहळ्या पासून दुरावले गेल्याने यांचे प्रचंड दुःख कुटुंबियांना सहन करावे लागणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांना रोहन नावाचा एकच मुलगा असून तो सैन्यात सिक्कीम येथे अधिकारी म्हणून कार्यरत आहे.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,मुलगा,मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here