सरकार कडून शेतकऱ्यांना मिळणार १० हजार कोटी अनुदान : सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील

0
48

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा मोठ्ठाच निर्णय घेतला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे.दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी केल्या नंतर आता सरकारने सन २०१७ _ १८ पासून तर २०२० पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ दिला जाणार आहे.नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बँकांनी पाठवली असून त्यातून पात्र शेतकरी निवडले जात आहेत पात्र शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सरकार कडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सन २०१७_१८ पासून नियमित कर्जाची परत फेड करणाऱ्या प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांचे कर्ज ५० हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जा एवढीच रक्कम प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक सह राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांच्या कडील नियमित कर्जदारांची यादी मंत्रालयातील सहकार विभागात सादर केली असून त्यांची छाननी सुरू आहे.आयकर भरणारे ,सरकारी कर्मचारी,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांना मात्र वगळले जाणार आहे.त्याआधी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाणार असून प्रोत्साहनपर अनुदान देताना दोन लाख पर्यंतच्या ज्या पात्र कर्जदारांना लाभ मिळालेला नाही त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.येत्या जून अखेर पात्र शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान वितरीत केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here