जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गट, गण रचनेचा कार्यक्रम जाहीर

0
112

आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : मो.९१५८४१७१३१

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या गट ,गणांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला असून त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत.दि. २७ जून o२२ रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करतील.विभागीय आयुक्तांकडे येत्या २३ मे ०२२ पर्यंत गट – गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे मार्फत सादर केला जाईल.३१ मे पर्यंत विभागीय आयुक्तांकडून प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.या प्रारूप प्रभाग रचने संदर्भात अधिसूचना २ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल.यापूर्वीचा फेब्रुवारीच्या राबविण्यात आलेल्या प्रारूप गट गण आराखडा रद्द करण्यात आला आहे.नवीन जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.२३ मे ते २७ जून या कालावधीत प्रारूप आराखडा अंतिम केला जाईल.दरम्यान अनेक हौशी आणि गवश्यांचे लक्ष या निवडणुका कधी होणार या साठी उतावीळ झाले आहेत.

नवीन धोरणानुसार जिल्ह्यातील दहा तालुक्यात ११गट व २२ गणांची झाली वाढ 

गत पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेने ह्या वर्षी जिल्हा परिषदेच्या निवडणूक साठी जिल्ह्यात ११ गट आणि पंचायत समितीच्या २२ गणांची वाढ झाली आहे.त्यामुळे जिला परिषद करीता आता ८४ गट व पंचायत समिती साठी १६८ गण असणार आहेत.

जिल्ह्यातील निफाड,नांदगाव,येवला,इगतपुरी आणि देवळा या पाच तालुक्यात एकही गट वाढलेला नाही.राहिलेल्या दहा तालुक्यात प्रत्येकी एक गट वाढलेला आहे यास अपवाद फक्त मालेगाव तालुका सांगता येईल कारण या तालुक्यात दोन गटांची वाढ झाल्याने येथील गट संख्या नऊ झाली आहे. सन २०११ जनगणने नुसार निवडणूक आयोगाने गट व गणांची संख्या गृहीत धरून आयोगाच्या सूचनेनुसार अंतिम प्रारूप आराखडा निश्चित करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.२०११ च्या जन गणंने नुसार जिल्ह्यात २४ लाख७८ ह.१६८ लोकसंख्या आहे त्याप्रमाणे २८ ते ३० ह.लोकसंख्येचा एक गट करण्यात येणार असल्याचे सांगितले. सन २०१७ चे निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात गटांची संख्या वाढली आहे.यानुसार नाशिक,सिन्नर,त्र्यंबकेश्वर,दिंडोरी,पेठ,बागलाण,कळवण,सुरगाणा या तालुक्यात गटांची संख्या प्रत्येकी एक ने व मालेगाव तालुक्यातील गटांची संख्या दोनने वाढली आहे. जिल्ह्यातील  सर्वाधिक १० गट असलेल्या निफाड तालुक्यातील ओझर गट रद्द झाल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात होते नव्याने गट तयार होणार अशी सर्वत्र जोरदार चर्चा झडत होती मात्र तालुक्यातील गट संख्या दहा कायम ठेवण्यात आली आहे. चर्चेस विराम मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here