दिल्लीत मोठी घडामोड : शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट , राजकीय चर्चांना ऊत

0
46

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : मो.9158417131

क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : विलास गडाख _ थेट मुंबई हुन _ सध्या देशासह राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे. अशातच राज्याच्या सत्तापक्षातील नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नंतर मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील ईडीतर्फे धाड टाकण्यात आली. या धाडीदरम्यान, राऊतांची अंदाजे ११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा कायम आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणखी आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राज्यभरात सत्त्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये संघर्ष तसेच चढाओढ सुरु असतानाच एक अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे.

दूध उत्पादकांनो लक्ष द्या! दुधाचे भाव पुन्हा वाढणार; भाववाढीचं महत्वाचं कारण समोर

विशेष म्हणजे, भाजपचा आज पक्ष स्थापन दिवस आहे. त्यामुळे सकाळपासून पंतप्रधान मोदी कार्यक्रमात व्यस्त होते. याच व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पंतप्रधान मोदी यांनी शरद पवारांना भेट दिली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आहे.

एसटी संपासंदर्भात मोठी अपडेट; एसटी महामंडळ संपाबाबत मूळ याचिकाच मागे घेणार?

पाच राज्यात निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी काही नेते केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करत असताना अडथळा आणतात आणि दबाव आणण्याचे काम करत आहे, असं वक्तव्य करून घोटाळेबाजांना इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी राज्यात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांना वेग आला होता. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक जेलमध्ये आहे तर अनिल देशमुख यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे अशा या वातावरणात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी आधी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेतली होती. या वेळी संजय राऊत सुद्धा उपस्थितीत होते. आमदार आणि खासदारांसोबत चर्चेनंतर आज शरद पवार पंतप्रधानांच्या भेटीला पोहोचले. या भेटीत काय चर्चा झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here