June 27, 2022

मालेगावी धरणे आंदोलन : केंद्र सरकारने मध्यान्न भोजन रक्कम कमी करून दारिद्र रेषेतील कोट्यावधी शाळकरी मुलांवर केला अन्याय, राज्यभर निदर्शने

1 min read

जाहिराती आणि बातम्या तसेच नवीन पत्रकार नियुक्ती साठी आजच संपर्क करा : भारत पवार , मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१.                                                    मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : 

केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात मांडलेल्या अंदाजपञकात शाळा शाळांमधून सुरु असलेल्या मध्यान्न भोजन रकमेत ५० % अनुदान रक्कम कमी केली. ” हा विशेषतः दारिद्र्य रेषेतील आणि त्यातही बहुजन समाजातील कसे बसे शिक्षण घेत असलेल्या कोट्यावधी शाळकरी मुलांवर अन्याय झाला आहे. या अनुदानात पुन्हा ताबडतोबीने १००% वाढ करावी ” या एकाच मागणीसाठी राज्यभर निदर्शने करावीत आणि स्थानिक प्रशासना मार्फत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन द्यावे असे आवाहन राष्ट्र सेवा दल राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी केले.त्या आवाहनास प्रतिसाद देत राष्ट्र सेवा दल मालेगाव तर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करुन केंद्रीय अर्थ मंत्री मा.ना. श्रीमती निर्मला सीतारामन निवेदने देण्यात आली. यावेळी राष्ट्र सेवा दल मालेगाव, सोबत शिक्षक भारती, राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना यांनी पाठींबा दर्शविला.
या वेळी राष्ट्र सेवा दल जिल्हा संघटक नचिकेत कोळपकर, राज्यमंडळ सदस्य भारत शेलार, शिक्षक भारतीचे राजेंद्र लोंढे, राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष धनंजय पाटील, प्रणाली शिंदे, प्रेमचंद शेलार,परेश बडगुजर, शिवदास निकम,सुधीर पाटील.आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.