देवळा तहसीलदार यांचा नियोजित ” माळवाडी ” दौरा निवडणूक कामानिमित्त रद्द
1 min read
देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क _ नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी विजय सूर्यवंशी यांचा देवळा तालुक्यातील माळवाडी येथील नियोजित दौरा निवडणूक कामानिमित्त अचानक रद्द झाल्याने पुढील माळवाडी येथील दौरा लवकरच अधिकृत नोटिसा बजावून संबंधितांना पुन्हा कळवणार असल्याचे तहसीलदार सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र न्यूज शी दूरध्वनी वरून बोलताना सांगितले. याबाबत समजलेली माहिती अशी की,माळवाडी येथील रहिवाशी आणि प्रतिष्ठित शेतकरी गंगाधर दोधा शेवाळे यांनी खरेदी केलेल्या शेतीत आज रोजी येण्या जाण्या साठी आणि मालवाहतूक करण्या साठी रस्ता नाही जुना असलेला रस्त्ता संबधित गोसावी शेतकऱ्याने नांगरून टाकून गंगाधर व त्याचे सर्व कुटुंब सदस्यांना जाण्या येण्या साठी मज्जाव करत असलयाने सदर चा असलेला जुना रस्ता ज्याची कागदोपत्री नोंद आहे असा रस्ता पुन्हा काढण्यात यावा अशी मागणी देवळा मामलेदार तथा तहसीलदार यांचे कोर्टात गंगाधर दोधा शेवाळे यांनी केली असल्याने देवळा तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी यांनी मामलेदार अधिनियम न्यायालय १९०६ कलम ५ ( २) नुसार प्रतिवादी मिथुन ( यशवंत ) सुरेशगिर गोसावी व अन्य यांना ता.३/३/०२२ रोजी पांधी रस्ता वहिवाट खुला करून देणेबाबत जबाब कामी प्रत्यक्ष शेतावर आज गुरुवार दिनांक १७/३/२०२२ रोजी उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती.परंतु तहसीलदार यांना आयागाचे निवडणुकीचे काम निघाल्याने नियोजित दौरा रद्द करून आजचा दौरा लवकरच नियोजित करून संबंधितांना पुन्हा नव्याने तारीख देऊन कळविण्यात येईल अशी माहिती तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी सूर्यवंशी यांनी क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज शी बोलताना दिली.
