…. अन्यथा राज्यातील तलाठ्यांचे घरभाडे बंद होणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

0
48

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ गावपातळीवर ” तलाठी ” हा महत्वाचा घटक असतो आणि आहे. त्यामुळे त्या त्या गावातील तलाठ्याने नेमून दिलेल्या ” “सजा ” नेमणुकीच्या ठिकाणी राहणे गरजेचे आहे.म्हणजे नागरिकांची विशेषतः शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. महाराष्ट्रात अनेक सजा मध्ये तलाठी कर्यालया जवळच त्यांचे निवास्थान बांधण्यात आलेले आहे.राज्यातील सर्व तलाठ्यांना त्यांच्या सजा मध्येच थांबण्याचा सूचना असून यानंतरही जे तलाठी सजा मध्ये थांबणार नाहीत त्यांचे घरभाडे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.                                       आ.राधाकृष्ण विखेपाटील यांनी संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असल्याबाबत विचारलेल्या  तारांकित प्रश्नांना उत्तर देताना महसूल मंत्री थोरात बोलत होते.७/१२ उताऱ्यासह इतर सर्व महसूल कामकाजाचे संगणीकरण केलेले असून कुठेही ऑनलाईन कागदपत्र मिळू शकतात.तरी सुद्धा कामे वेळेवर व्हावीत ,शेतकऱ्यांची किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात येतील .                               आंबीदुमाला गावात नियमित तलाठी नियुक्त करण्यात आले असून विजेची अडचण असली तरी लॅपटॉप द्वारे संगणीकृत ७/१२ उतारे दिले जात आहेत या कार्यालयाचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगून आंबीदुमाला गावात अवैधपणे गौण खनिज उत्खनन केले जात असलयाच्या तक्रारीची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असेही महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here