जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक २४ एप्रिल रोजी होणार ?
1 min read
मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क _ महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगर पालिका यांची मार्च महिन्यात निवडणूक होणार म्हणून अनेक इच्छुक उमेदवारांनी गुडघ्यास बाशिंग बांधून रन रीती बांधत असताना शासनाने निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्याची घोषणा करताच अनेक ” उतावीळ ” वीरांचा हिरमोड झाला.ओबीसी आरक्षणामुळे व महाराष्ट्र सरकारने मांडलेले विधेयक यामुळे जिल्हा परिषद आणि महानगर पालिका यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या असल्याचे सांगितले गेले आणि जिल्ह्यात प्रशासक पण अवतरले.असे असताना या निवडणुका येत्या २४ एप्रिल ०२२ रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या खात्रीशीर सूत्रांकडून समजते.
