शेतकऱ्यांनो सावध : बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता ,वेळीच नियोजन करा_ जिल्हाधिकारी

0
113

पाटोदा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी 
बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुचित करण्यात येते की भारतीय हवामान विभाग यांच्या द्वारे 08-03-2022 ते 11-03-2022 या दरम्यान महाराष्ट्र राज्य मध्ये तसेच आपल्या बीड जिल्ह्यातील काही भागांमध्ये वेगाच्या वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे तरी काढणीपश्‍चात सुकवणी केल्या जाणाऱ्या पिकांचे काढणीनंतर सुरक्षित जागी योग्य व्यवस्थापन करावे. तसेच जे पीक काढणीला आलेले आहेत त्याचे हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार पिक काढणीचे नियोजन करण्यात यावे.
दरम्यानच्या काळामध्ये पिकांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ,पाणी साचून जर नुकसान झाले तर रब्बी 2021-22 पिक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांनी ७२ तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या ऑनलाइन तक्रार / पूर्वसूचना करावी.

तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमांक यासोबत देण्यात आलेले आहेत.

तरी दरम्यानच्या काळामध्ये नुकसानग्रस्त पीक विमाधारक शेतकरी बांधवांनी वेळीच तक्रारी दाखल कराव्यात.. असे आवाहन
राधाबिनोद अ. शर्मा
जिल्हाधिकारी, बीड
यांनी केले आहे.

तक्रार करण्यासाठी हे App डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

कंपनीचा टोल फ्री क्रमांक
१८००-४१९-५००४

ई-मेल – pikvima@aicofindia.com

तालुका प्रतिनिधी यांचे क्रमांक खालील प्रमाणे-

बीड – कदम शेखर बाबासाहेब- 8793999931
पाटोदा – संपद आश्रुबा गोल्हार – 9764552203
शिरूर कासार – पवन लहू जोगदंड – 9803097871
आष्टी – विनोद प्रभाकर लोंढे – 9146840101
गेवराई – आनंद यशवंत कुहेर – 8329135789
धारूर – उत्तरेश्वर गणेशराव नखाते – 9309573764
वडवणी – लहू जनार्धन सावंत – 9604070860
आंबेजोगाई – नंदकुमार मुकुंद पोटभरे- 9405102426
केज – राहुल अर्जुन चौरे – 8007330021
परळी वैजनाथ – भागवत अरुण डापकर – 8830688898
माजलगाव – अशोक लक्ष्मण मुळे – 9405095013

जिल्हा व्यवस्थापक (बीड)
इनकर बाबासाहेब भीमराव – 9850310053

आपल्या तक्रारी ,तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे मांडाव्यात.
022-61710903

http://www.aicofindia.com/AICEng/pages/griavance_Home.aspx

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here