June 27, 2022

रशिया आणि युक्रेन युद्ध शांततेसाठी शासकीय आश्रमशाळा देसगाव येथील विद्यार्थ्यांनी केली प्रार्थना

1 min read

देसगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : योगीताबाली पवार : 

रशिया – युक्रेन युद्ध संघर्ष सुरू असताना संपूर्ण जगभर युद्ध परिणामांबद्दल चिंता व्यक्त होत असताना शासकीय माध्यमिक आश्रमशाळा देसगाव ता. कळवण जि. नाशिक येथील विद्यार्थ्यांनी रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्ध थांबावे याकरिता प्रार्थना केली व युद्धातील वीर मरण आलेल्या दोन्ही देशातील सैनिकांना श्रद्धांजली अर्पित केली.
या क्षणी युद्धाचा निषेध करणारे प्रतीक (Badge) सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या गणवेशाला लावले होते व युद्धाची भीषणता दाखवणारे कोलाज चित्र शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते. मा. मुख्याध्यापक श्री.बी. एन. देवरे सर यांनी विद्यार्थ्यांना युद्धाच्या दहाकतेची व भविष्यातील त्याच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली. या क्षणी कोणत्याही देशाला विरोध अथवा समर्थन न करता संपूर्ण विश्वाला युद्धाची नाही तर शांततेची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक श्री.किशोर भिसे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना ‘जागतिक शांतता – काळाची गरज’ या विषयावर आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. “No War Please ” या घाषणेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमात शाळेतील शिक्षक श्री.निंबा चव्हाण , श्री. राजाराम पवार ,श्री.गंगाधर लांडे , श्री. अशोक खांडवी , श्री. रामसिंग राजपूत ,श्री.संदीप वाघ , श्री.भाऊसाहेब उघडे ,श्री.निलेश कासार , श्रीम.वनिता चव्हाण , श्रीम.रंजना गायकवाड ,श्री. दिलीप दांडगे तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.