September 25, 2023

महिला दिनानिमित्त माणगाव न. प.तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

1 min read

माणगाव ( रायगड ) : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नरेश पाटील :  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरपंचायत माणगांव तर्फे सन्मान सोहळा तसेच मनोरंजन कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहेत. सदर कार्यक्रम महिला,बालकल्याण व युवक कल्याण समितीचे सभापती शर्मिला शोभन सुर्वे यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आले आहेत. हा उपक्रम मंगळवारी दी.08 मार्च्च ०२२  रोजी माणगांव न.पं.च्या आवारात संपन्न होत आहे.

सायंकाळी 04:30 ते  रात्री 08:30 पर्यंत नवनिर्वाचित पदाधीकारी  आणि कर्मचारी यांचा सत्कार,कर्तबगार महिलांनचा सत्कार व मार्गदर्शन त्यानंतर महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम होणार तसेच  दि.09 रोजी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येते होणार आहे.हे शिबीर सकाळी 10:30 वाजल्यापासुन सुरु होईल.या शिबिरात महिला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्रुती निकम,सिद्धी कामेरकर निलिमा यादव,अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.अभिजित मेहता,जगदीश पटेल,हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अजय मेहता,डॉ. तुषार शेठ यांच्या प्रमुख उपस्थित तसेच जनरल सर्जन अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले, डॉ. संतोष कामेरकर यांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे.

महिला आरोग्य शिबिराचा प्रमुख उद्घाटक ना.सुभाष देसाई मंत्री उद्योग,खनिकर्म व मराठी भाषा विभाग महाराष्ट्र तसेच प्रमुख उपस्थिती मा.श्रीम.प्रियंका चतुर्वेदी शिवसैनिक राज्यसभा खासदार,मा.डॉ.महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी रायगड,मा.डॉ.सुहास माने जिल्हा शल्या चिकित्सक,प्रमुख पाहुणे मा.राजीव साबळे. शिवसेना नेते,तसेच कार्यक्रमचे अध्यक्ष ज्ञानदेवजी पवार नगराध्यक्ष, माणगांव नगरपंचायत हे उपस्थित राहणार आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.