क्रिकेट विश्वाला धक्का :ऑस्ट्रेलियाचा जागतिक फिरकीपटू शेन वार्न यांच निधन
1 min read
ऑस्ट्रेलिया : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : ऑस्ट्रेलियातील महान फिरकीपटू शेन वॉर्न याच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.तो ५२ वर्षाचा होता.जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू अशी त्याची ख्याती जगात होती. शेन वॉर्न च्या निधना मुळे क्रिकेट विश्वातील प्रत्येक क्रिकेटपटूंना आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का सहन करावा लागत आहे.जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू आणि एक दिग्गज कर्णधार अशी त्याची ओळख होती. शेन वॉर्नने १४५ कसोटी सामन्यात ७०८ विकेट्स घेतल्या आहेत.तर १९४ एक दिवसीय सामन्यात २९३ फलंदाजांना माघारी पाठवले आहे.शिवाय ५५ आयपीयल सामन्यात वॉर्नने ५७ विकेट्स मिळवले होते.अशा ह्या विख्यात माजी क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलिया देश मुकला असून एक जादुई फिरकीपटू आपल्यातून निघून गेला आहे.अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.भारतातही त्याचा चाहता वर्ग आहे.
