खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष पदी धनंजय पाटील

0
52

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी राज्यभरात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत.तसेच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.                 संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : मो.९१५८४१७१३१.                                                 महाराष्ट्रभरातून ” महाराष्ट्र न्यूज ” ची वाचक संख्या : ५७००० + 

महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ मालेगाव तालुका शाखेची सन 2022 ते 25 या कार्यकाळासाठी नूतन पदाधिकारी निवड बैठक कर्म या ना जाधव विद्यालय मालेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था चेअरमन सुनील वडगे यांचे अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडली.या वेळी व्यासपिठावर संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे, सचिव सुनील बिरारी,उपाध्यक्ष हरिकृष्ण सानप, कोषाध्यक्ष दादाजी अहिरे,जिल्हा संघटक अविनाश साळुंखे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय जीभाऊ शिंदे, जिल्हा महिला प्रमुख संगीता सोनवणे तसेच कै.ल. रा. काबरा विद्यालय चेअरमन महेंद्रकुमार मोदी,संचालक सुनील शर्मा, अशोक गुप्ता, आदि मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि मनीषा कुलकर्णी यांचे सुमधुर आवाजातील स्वागत गीताने बैठकीस सुरवात झाली. संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष विकास मंडळ, जिल्हा पदाधिकारी रमेश आहिरे ,राजेंद्र गोसावी , गानसाम्राज्ञी लता मंगेशकर आणि सर्व दिवंगत साथीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात नचिकेत कोळपकर यांनी भूमिका विशद केल्यानंतर सर्वानुमते जिल्हाध्यक्ष नन्दलाल धांडे यांचे निरीक्षणाखाली नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात धनंजय वसंत पाटील अध्यक्ष,संगीता विक्रम सोनवणे उपाध्यक्ष,अरुण रामदास साळुंखे उपाध्यक्ष,मयूर किरण सोनवणे सचिव,फुला भाऊ साहेब शिंदे सहसचिव, अंकुर रामा कुवर सहसचिव, दिपकसिंग जगन्नाथ महाले कोषाध्यक्ष, कविता विकास मंडळ हिशेब तपासणीस, नचिकेत कोळपकर प्रसिद्धी प्रमुख, तर सदस्य पदी दीपक सदाशिव आहिरे ,कल्पना अनिल अहिरे,प्रल्हाद गुलाबसिंग धांडा ,मनीषा गणेश कुलकर्णी, लुकमान एम कुरेशी,भाऊसिंग म्हसू शेवाळे, स्वप्नाली कारभारी पवार, अशी निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प आणि निवड पत्र देऊन सत्कार करण्यात आला. व्यास पिठा वरील मान्यवरांचा सर्व शिक्षकातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी विनोद आहिरे आणि विनोद साळुंखे या जेष्ठ शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने शिक्षकाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे सांगितले. जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या, संघटना नेहमी शिक्षकसोबत आहे ,तुमचे प्रश्न आमचे पर्यंत पोहोचू द्या ते सोडविलेच जातील असे आश्वासन दिले. अध्यक्षीय समारोपात सुनील वडगे यांनी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने संघटना बळकट करा असे सांगून सर्वाना शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन अरुण साळुंखे यांनी केले.शेवटी राष्ट्रगीत होऊन बैठक संपन्न झाली.
सूत्र संचालन नरेंद्र गुरव यांनी केले.यावेळी व मालेगाव मधील खाजगी शाळा मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here