सरपंचाच्या बोकांडी ” लाच ” बसली , लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याची रवानगी तुरुंगात केली
1 min read
आपल्या स्थानिक ताज्या घडामोडी आणि जाहिराती साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.९१५८४१७१३१. देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुका गुन्हेगारी जगात अव्वल येण्याचा ” मान ” पटकावतो की काय ? असा प्रश्न साहजिकच घडणाऱ्या घटनाक्रमा नुसार सर्वसामान्यांना पडणे स्वाभाविक आहे.देवळा पोलीस ठाणे हद्दीत महिनाभरात चैन चोरी, बाईक चोरी,ताजेच असलेले एका प्रेमिकेने प्रेमविराच्या गावी येऊन जळीत कांड करणे यात काही दिवसांनी प्रेमविराचा मृत्यू होने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करणे यांसारख्या घटना घडत असताना आणि त्यामुळे देवळा पोलीस निरीक्षक लांडगे ,पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांना सारखी करावी लागणारी कसरत करत असताना काल तालुक्यातील चींचवे ( नीं ) गावाच्या सरपंचाने लाच ” बोकांडी ” घेतल्याचा बेशरम प्रकार घडल्याने बोकांडी बसलेली लाच खाली उतरवण्या साठी ठेकेदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली.त्यांनी सापळा लावून सरपंच पदाचे मानकरी असलेले रवींद्र शंकर पवार यांनाअलगद अडकून त्याची आणि साथीदाराची रवानगी तुरुंगात केल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरपंच पदालाच काळीमा फासल्यामुळे जिल्ह्यात सरपंच पदाची मोठी मानहानी झाल्याने तालु्यातील सरपंचांना मोठा शॉकच बसला तर तालुक्यात रहिवाश्यांना सखेद आश्चर्य वाटत आहे.तर ” भ्रष्टाचारात बरबटलेला सरपंच ” म्हणून चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत मिळालेली हकीकत अशी की, ठेकेदारास काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्या करीता चिंचवे ( नि ) ता.देवळा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच गावाचा कारभारी ,शिरजोर भारी म्हणून त्या कारभारीने सरपंच पदाचीच जणू बोली केली असे म्हणणे वावगे ठरू नये.तक्रारदार यांनी ग्रामपंचायती मार्फत शासकीय निवेदना नुसार शिवस्मारक उद्ध्यान चौक सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण केले त्याबाबत चिंचवें ( नि ), ग्रामपंचायती कडून काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ठेकेदारास पाहिजे होते. म्हणून प्रमाणपत्राची मागणी सरपंच यांचे कडे केली.सरपंचांनी चक्क पाच टक्क्या प्रमाणे २२००० ह.रुपयांची मागणी केली.तडजोडी नंतर २० हजार रुपये देण्याचे ठेकेदाराने कबूल केले. एक प्रकारे सरपंच पदाची बोली झाल्याने सरपंच रवींद्र शंकर पवार यांनी लाच बोकांडी घेतल्याने बोकांडी घेतलेली लाच खाली उतरवन्या साठी ठेकेदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारी ची खात्री करून सापळा रचला गेला आणि संशयित सरपंच अलगद अडकून उचलला गेला.२० हजार रुपयाची रक्कम एका खासगी इसमा स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आणि रवींद्र शंकर पवार,सरपंच , ( वय ४०) ,किशोर माणिक पवार (वय४० ) या दोघी लाचखोरांना ताब्यात घेऊन जेल मध्ये रवानगी केली. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने ,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे ,पोलिस उपअधीक्षक सतिश भामरे (वाचक) यांचे मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक साधना भोये _ बेलगावकर ,पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,पो. कॉ.गोसावी, मोरे,पो.ना.प्रकाश महाजन,शरद हेंबाडे , बतिशे,परशुराम जाधव आदींनी सापळा रचून कामगिरी यशस्वी केली .
