June 27, 2022

इंदुरीकर महाराजांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे घेतली धाव , गुन्हा दाखल केला राव !

1 min read

स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले परखड निर्भिड विचाराचे क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी संपूर्ण राज्यात पत्रकार नियुक्त करण्यात येत आहेत तसेच आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती महाराष्ट्र भर पोहचविण्यासाठी संपर्क करा.                   आमची वाचक संख्या : ५७०७६ +                            संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.९१५८४१७१३१.                                                 अहमदनगर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी : _ प्रख्यात किर्तनकार कॉमेडी किंग ह भ प निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी थेट अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या धाव घेतली आणि म्हणाले आता नाही माघार केली तक्रार .गेल्या काही दिवसांपासून माझ्या संमती शिवाय किर्तनाच्या सिडी प्रसारित होत असलयाने हा अन्याय आहे.याप्रकरणी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे कडे केली आहे.याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की,इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या किर्तनाच्या सिडी बनविण्याचा अधिकार एका कंपनीला दिले आहेत परंतु संबंधित कंपनी त्या अधिकाराचा गैरवापर करीत आहे अशी महाराजांनी  तक्रार दाखल केली असून याविषयी चौकशी सुरू केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचेशी सुध्दा महाराजांनी चर्चा करून तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.