दगेबाज हजारो फ्रॉड शिक्षक खरंच गजाआड होतील काय ?
1 min read
आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५६००० + वाचक संख्या असलेले महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि वाचकांच्या मना मनात असणाऱ्या क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज करीता राज्यभरात ” पत्रकार ” नियुक्ती करण्यात येत आहे.तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा : संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज .मो.९१५८४१७१३१ धुळे : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _

धुळे , जळगाव, नंदुरबार, नाशिक, जिल्ह्यात व राज्यभरातच टीईटी परीक्षेत अपात्र असताना लाखो रुपये लाच देवून पात्र सर्टफिकेट विकत घेणारे तब्बल ७ हजार ९०० फ्रॉड शिक्षक आता बडतर्फी व गुन्हे दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. अशा फ्रॉड शिक्षकांची यादी तपासी यंत्रणांच्या हाती देण्यात आली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात कोण – कोण शिक्षक पैसे देवून पात्र झाला आहे, याची नावे गावागावात चर्चिली जाणार आहेत. शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानले जाते. देशाची पिढी व देशाचे भवितव्य घडविणे त्यांच्या हातात असते. देशाच्या भावी पिढीला सुसंस्कृत करण्याचे त्यांचे काम असते. विद्यार्थ्यांसमोर आपले गुरुजन आदर्श असले पाहिजेत. मोठ – मोठे राजे महाराजे सम्राट गुरुजनां समोर नतमस्तक होताना आपण वाचले आहे, बघितले आहे . भारतात शिकलेल्या एका अरब सम्राटाने त्यावेळी त्याचे गुरु असणार्या भारतीय नेत्याचे विमानतळावर स्वतः स्वागत करून स्वतः ड्रायव्हिंग करत गाडी नेली होती. ही तर अलिकडची घटना आहे. एकूणच काय तर गुरु बनणार्याने साधन शुचिता बाळगणे आवश्यक असते. पण अलिकडे ही सर्व साधन शुचिता खुंटीला टांगून ठेवण्यात आली आहे. काही शिक्षक बनु इच्छिणारे उमेदवार व पूर्णतः सडलेली, किडलेली, गळलेली शिक्षण क्षेत्राची शासकीय व्यवस्था यांनी मिळून हा घाणीचा रेकॉर्ड तयार केला आहे. या सिस्टिम मध्ये बी एड , डी एड प्रवेश देणग्या. नोकरी साठी बाजार बसवे शिक्षण संस्था चालकांनी मांडलेले लिलाव. त्यानंतर विविध मान्यता मंजुर्या व प्रत्येक पायरीवर प्रत्येक कागदासाठी प्रत्येक सहीसाठी प्रत्येक बनावट कामांसाठी शिक्षण विभागाने कसाई खाटका सारखा मांडलेला पैसे खाण्याचा बाजार. या सर्व बाजारात कुठे आहेत आदर्श ? कुठे आहे शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य ? या घाणीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल असे हे आताचे प्रकरण आहे. राज्य परिक्षा मंडळाचे शिक्षक पात्रता परिक्षा अर्थात टीईटी चे गाजणारे हे प्रकरण आहे. परिक्षा मंडळाचे सुपे वगैरे गँगने अक्षरशः कोट्यवधि रुपये खाउन तब्बल ७ हजार ९०० अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून शिक्षक बनविले. याचा अर्थ .. प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्या एवढ्या पात्र शिक्षक उमेदवारांना डावलले गेले. त्यांच्यावर अन्याय झाला. योग्य प्रामाणिक पात्र शिक्षक बाहेर राहिले व प्रमाणपत्र विकत घेणारे अप्रामाणिक फ्रॉड शिक्षक भावी पिढी घडविण्यासाठी कामावर रुजू झाले. असे फ्रॉड शिक्षक विद्यार्थ्यांना काय आदर्श शिकवतील? कोणत्या तोंडाने विद्यार्थ्यांना ते प्रमाणिकपणा व सुसंस्काराचे धडे देतील? त्यावेळी त्यांना स्वतःलाच ‘ गिल्टी ‘ वाटणार नाही काय? एक पिढी बर्बाद करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यावर वेळीच तातडीने इलाज होणे आवश्यक आहे. कायद्याने देखील लाच घेणे हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणे देखील गुन्हा आहे. नोकरीवर रुजु अशा हजारो शिक्षकांचा शोध आवश्यक आहे. राज्य शासनाने व संस्था चालकांनी त्यांना ताबडतोब सेवा मुक्त केले पाहिजे. प्रस्थापित कलमांखाली त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रात फारच टोकाची घाण झाली आहे. बोगस अपंग युनिट व बोगस शिक्षक समायोजन प्रकरण सुर्यप्रकाशा इतके स्वच्छपणे उघड झाले आहे. यातही कोट्यवधींची हेराफेरी झाली आहे . तरीही शासन व शिक्षण विभाग यावर मुग गिळून गप्प बसला आहे . त्यातही काही ‘ व्यवहार ‘ झाला आहे काय ? अशी शंका लोकांना येते. आता या ७ हजार ९०० फ्रॉड शिक्षकांबाबतही पुढील काळात काही ” व्यवहार ” होवू नये असे जनमत आहे. पण शिक्षण विभागाने ‘ सडलेपणाची हाईट ‘ गाठली आहे. त्यामुळे भविष्यात काहीही घडू शकते! आपण फक्त मुकपणे गंमत बघणे, एवढेच नागरिकांच्या हाती आहे!- लेखक : योगेंद्र जूनागडे , धुळे
फिडबॅक -डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डेली पथदर्शी डॉट कॉम.
पत्ता – सुयोग डिजिटल प्रिंटर्स जवळ, श्रीराम कॉम्प्लेक्स,साक्रीरोड, धुळे. Email – pathadarshi@gmail.com ९४२३४९७७३९