मी दवाखान्यातून जाऊन घरी येते असे सांगत दोन चिमुकल्यांना घेऊन महिला गायब

0
55

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील ५४४३४+ वाचक संख्या असलेले परखड निर्भिड विचार धारेचे वाचकांच्या घराघरात आणि मनामनात असलेले क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज साठी आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा… संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१                           सटाणा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी : मी दवाखान्यातून जाऊन घरी येते असे सांगून महिला दोन चिमुकल्यांना घेऊन गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत सटाणा पोलीस  सूत्रांकडून हाती आलेल्या वृत्तानुसार तालुक्यातील इंग्लिश मिडीयम स्कूल जवळील परिसरात घटना घडली असून महिलेचे पती पवन विठ्ठल वाघ यांनी सटाणा पोलिसात मिसिंग फिर्याद दाखल केली आहे पत्नी सौ.रेखा पवन वाघ हि दि.३० डिसेंबर ०२१ रोजी दवाखान्यात जाऊन येते असे सांगून आपले दोन लहान मूल नामे देवेंद्र पवन वाघ (वय ०४वर्ष),मुलगी वैष्णवी पवन वाघ ( वय ०२वर्ष) यांना घेऊन कपड्यांच्या बॅग सह सदरची महिला दवाखान्यात जाऊन येते असे सांगून निघून गेली आहे आज पर्यंत पती पवन वाघ याने सर्वत्र तपास शोध केला असता महिला आढळून न आल्याने अखेर सटाणा पोलिसात बेपत्ता मिसींग ची फिर्याद दाखल केली आहे.महिलेने घरातून निघताना आधार कार्ड आणि महत्वाचे कागदपत्र सोबत घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदरची महिला कुणास आढळून आल्यास सटाणा पोलिसात किंवा ९२०९३१२०६ / ७५८८४२४६२२ ह्या नंबर वरती संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here