January 16, 2022

नोकरीस असलेल्या मुलांनी आईचा जगण्याचा केला होता वांधा….मुलींनीच दिला आईला खांदा….!सर्वत्र हळहळ …

1 min read

अवघ्या काही सेकंदात जाहिरात/ बातम्या आपल्या  गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे निर्भिड ,सडेतोड “महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनल.करीता जाहिरात आणि तुमच्या परिसरातील बातम्या साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.9158417131.                                   औरंगाबाद : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ मनाला चटका लावणारी सत्य घटना आहे औरंगाबाद येथील ….मुलांचे पितृ छत्र हरपले आणि मुलांना सांभाळण्याची मोठी जबाबदारी आई गं.भा. चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांच्यावर पडली. आई चंद्रभागाबाई हिस तीन मुलं आणि तीन मुली आहेत मुलींचे लग्न झालेले असले तरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत  मुलांना मोठे केले.त्यांचे शिक्षण करून नोकरीस लावले.मोठा मुलगा हनुमंता आनंदा साखळे ,कृषी अधिकारी ,दुसरा मुलगा बाळाराम आनंदा साखळे हा हायोर्टात लिपिक तर तीन नंबरचा मुलगा नबाजी आनंदा साखळे कंपनीत नोकरीस कार्यरत आहे.हे तीनही मूल नोकरीस लागून बेभान झाले…विकृत झाले आणि आईस सांभाळण्यास सपशेल नकार देत स्वतःच्या बायका आणि मुलांमध्ये रममाण झाले.अतिशय गरीब,नम्र , कष्टकरी असलेल्या आईस सांभाळण्यास नकार दिल्याने मुलींच्या डोळ्यात अश्रू तरळले तर आईचे हृदय दुःखाने भरले.अशा अवस्थेत मुलगी सुभद्राने स्वतःला सावरत आईस धीर दिला.आणि वीस वर्षांपासून आईचा सांभाळ मुलगी आणि जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी केला. काल वृद्धापकाळाने गं.भा. चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांचे दुःखद निधन झाले. येवढ्या वर्षांपासून अनेकदा मुलगी व जावई यांनी फोन करून सुद्धा भान नसलेली हि तीनही मुलं आईला भेटायला सुध्दा आले नाहीत.की कधीतरी आईची आठवण तर नाहीच की साधी विचारपूस सुध्दा केली नाही.आईचे निधन झाल्याचे कळल्यावर अगदी शेवटच्या क्षणी दोन मुलं येऊन दूरवर उभी राहिली सर्वात मोठा मुलगा तर आलाच नाही हा प्रकार पाहून चंद्रभागाबाई यांच्या तीनही मुलींनी ,नातलगांनी आणि हरसुल बालाजी नगर परिसरातील सर्व नागरिकांनी आईच्या प्रेतास मुलांना हात लाऊ द्यायचा नाही असा पवित्रा घेतला.आणि शेवटी जिजाबाई,सुनीता व सुभद्रा ह्या लेकिंनी आईस शेवटचा खांदा देऊन सर्व अंतिम संस्कार पूर्ण केले.यावेळी माजी उपमहापौर विजय अवताडे यांचेसह परिसरातील नागरिक,नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते.कठोर पाषाण हृदय असलेल्या तीनही मुलांविषयी संताप व्यक्त केला जात होता तर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.जावई श्रीकृष्ण टाकसाळे आणि लेक सुभद्रा यांचे कौतुक केले जात आहे.

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.