January 17, 2022

असंख्य अनाथांची माय हरपली ! अनेकांनी हंबरडा फोडला

1 min read

तुमची बातमी आणि जाहिरात अवघ्या काही सेकंदात आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात आणि मनामनात पोहचविणारे निर्भिड,सडेतोड “महाराष्ट्र न्यूज” वेब चॅनल साठी जाहिरात व बातमी साठी संपर्क करा आणि राज्य भरातून जोरदार प्रसिध्दी मिळवा… संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक ,मो.9158417131.                मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : _ प्रतिनिधी _

 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या , आपल्या  कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व  वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला .त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.