सप्तशृंगी गड येथे ओबीसी राष्ट्रीय महिला महासंघाची बैठक संपन्न

0
47

तुमच्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती अगदी पाच सेकंदात आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात मनामनात पोहचविणारे निर्भिड सडेतोड महाराष्ट्र न्यूज चॅनल.. साठी बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा.तसेच कळवण / सटाणा / मालेगाव / देवळा तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात महिला /, पुरुष पत्रकार नेमणे आहेत.इच्छुकांनी संपर्क साधावा .संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक : मो. 9158417131 .                                                    मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _   कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड येथे ओबीसी राष्ट्रीय महिला महासंघाची नासिक जिल्हा बैठक संपन्न झाली.या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या नाशिक जिल्हाध्यक्ष सौ.स्वाती वाणी यांनी अध्यक्षस्थान भूषविले.स्वाती वाणी,कविता मंडळ, सटाणा तालुकाध्यक्ष रुपाली कोठावदे,रेखा वाघ,

मालेगाव तालुकाध्यक्ष जयश्री धामणे, उपाध्यक्ष अलका भावसार, मालेगाव शहराध्यक्ष हर्षिता आहिरे शामल सुरते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी ओवी बच्छाव हिने “मी सावित्री बोलतेय”हा एकपात्री प्रयोग सादर केला. कविता मंडळ यांनी सावित्री बाई व ओबीसी विषयी माहीती दिली तसेच महिलांच्या पा़ळी *मेन्स्ट्रअल कप* संदर्भात शामल सुरते यांनी मार्गदर्शन केले. रेखा कोठावदे यांनीही सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला.तसेच सावित्रीबाईंच्या ओव्यांचे सामुहिकरीत्या गायन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष स्वाती वाणी यांनी ओबीसी महिला महासंघ काय आहे,त्याची व्याप्ती आणि महत्व याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललिता गुंजाळ यांनी केले.कार्यक्रमासाठी सटाणा,कळवण आणि मालेगाव राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ओबीसी संदर्भातील घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला होता.आलेल्या सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प आणि महात्मा फुले यांची जीवनी देऊन स्वागत करण्यात आले.मान्यवरांचा परिचय कळवण तालुकाध्यक्ष दिपाली बच्छाव यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आयोजक कळवण तालुक्यातील दिपाली बच्छाव आणि उपाध्यक्ष सुनिता येवला यांच्या प्रयत्नांनी अतिशय नियोजनबध्द व सर्वसमावेश असा कार्यक्रम झाला.कोव्हिडचे सर्व नियमांचे पालन करून आणि सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमाप्रसंगी कळवण,सटाणा आणि मालेगाव येथील पदाधिकाऱ्यांसह समस्त ओबीसी महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होता.कळवण करांच्या अनमोल सहकार्याने सुनिता येवला यांनी आभार मानून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here