January 17, 2022

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सण म्हणून साजरा करावा _ आबा खैरनार

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक ,मो.9158417131. देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ पिंपळगाव येथील समता सैनिकांसह अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस आबासाहेब खैरनार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना उपस्थित समता सैनिक रमेश खैरणार , योगेश खैरनार ,यशवंत खैरनार ,भाऊसाहेब खैरनार, मनोज खैरनार ,नानाजी खैरणार , केशव खैरनार, संजय खैरनार ,पिंटू सोनवणे, योगेश सोनवणे व इतर.

तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव वाखारी येथे प्रतिमा पूजन करताना आबासाहेब खैरनार, नदीश थोरात, हेमलता खैरनार, विष्णू पाटील ,धामणे मॅडम ,बोरसे गुरुजी ,पानसरे गुरुजी व विद्यार्थी यावेळी आबा खैरनार यांनी  आपल्या मनोगतात सांगितले की आज महिला शिक्षिका व उच्च पदावर पोहोचल्या त्या फक्त  ज्यांनी शिक्षणाची क्रांती या देशात घडवली त्या महान विभूती मुळे ज्या लक्ष्मीला कोणीही पाहिले नाही तिच्या नावे मार्गशीर्ष महिन्यात  स्त्रिया व मुली उपवास  करतात परंतु जा मातेमुळे स्त्री असून मूल सोडून घराचा उंबरठा ओलांडून अनेक क्षेत्रांत क्रांती करत आहेत त्या मातेचा जन्मदिवस नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येतो तो दिवस  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मदिवस सण म्हणून साजरा करायला हवा व क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा असे मनोगत यावेळी व्यक्त केले.

More Stories

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.