जनते साठी तहसील कार्यालय आता पहाटे सुद्धा सुरू ,असा अधिकारी होणे नाही…मालेगाव तहसील चे अधिकारी कर्तव्यात काळजीने राहतात दक्ष म्हणून सकाळी ३ वाजता अपील चालवण्यात घालतात लक्ष !

0
100

आपली जाहिरात व बातमी अवघ्या काही  सेकंदात आपल्या स्थानिक गावांसह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात मनामनात पोहचविणारे निर्भिड,सडेतोड फक्त महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल. म्हणून तुमची जाहिरात आणि बातम्या साठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार ,मुख्य संपादक ,मो.9158417131.                                                मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील तहसील कार्यालयातील त्या अधिकाऱ्याचा अजब कारभार असल्या कारभारामुळे तहसीलच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी वेळच लागणार नाही.आणि जनतेच्या कुठल्याही तक्रारीत न्याय योग्यच मिळणार ? यात शंका (न)घेणे हे पहाटेच्या असल्या(बे) जबाबदार अधिकाऱ्यांच्या कामकाजा वरूनच लक्षात येते. असल्या अधिकाऱ्यांना शासनाने पुढील प्रमोशन म्हणून प्रशिक्षणास त्यांना पाठविले तर अजून नक्कीच कामकाजात त्यांच्या कर्तव्यात पारदर्शकता येणार हे नक्की.त्याचे असे झाले माहिती कार्यकर्ता रामदास कारभारी बच्छाव ,दरेगाव यांनी येथील तहसील कार्यालयात एका प्रकरणात माहिती अधिकार टाकला होता. संबंधित माहिती अधिकारी यांनी वेळेत माहिती दिली नसल्याने बच्छाव यांनी जनमाहिती अधिकारी तथा जमाबंधी अव्वल कारकून तहसील कार्यालय मालेगाव यांचे विरुद्ध प्रथम अपील येथील तहसील कार्यालयात दाखल केले. त्याची दखल घेत माहिती अधिकार अधिनियम 2005 चे कलम 19 (1) नुसार प्रथमअपील अधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार  यांनी कर्तव्यात कसूर न करता सदर अपिलाची नोटीस बच्छाव यांना बजावण्यात आली त्या नोटीस मध्ये स्पष्टपणे उल्लेख केला आहे की, सुनावणी करीता इकडील कार्यालयात सकाळी ०३ ०० वा.घेण्यात येणार आहे.आपण उपस्थित राहावे असे.दिले आहे. कार्यालयीन शासकीय कामकाजाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असते आणि आहे.त्यामुळे रामदास बच्छाव यांच्या मनात अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळे विषयी संताप व्यक्त केला जात असून.असे कर्तव्यदक्ष अधिकारी कायम असल्यास जनतेचे बारा वाजल्या शिवाय राहणार नाहीत.तर असा” कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा  होणे नाही ” असा खोचक टोला बच्छाव यांनी मारला असून मात्र वेळेची शहानिशा करण्यासाठी बच्छाव यांना तहसील कार्यालयाची पायरी चढावी लागली आणि प्रथम अपील अधिकाऱ्याची कर्तव्यता त्यांच्या लक्षात आणून दिली.ह्या घटनेची मात्र शहरात चर्चा होत आहे. अधिकाऱ्यांनी मात्र बेभान होऊ नये असेही चर्चच्या ओघात नागरिकांचे बोल आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here