देवळा पब्लिक स्कूल राष्ट्रीय पातळीवर खेळणार ,उमेश सांगळे ,भावेश सूर्यवंशी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
15

अवघ्या काही सेकंदात आपले स्थानिक गाव आणि प्रभागासह संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांच्या घराघरात व मनामनात तुमची जाहिरात आणि बातम्या पोहचविणारे एक निर्भिड दमदार आणि सडेतोड फक्त “महाराष्ट्र न्यूज “वेब चॅनल. तुमची जाहिरात व बातमी देण्यासाठी संपर्क ,मो.9158417131.                     मुख्य संपादक : भारत पवार                                     देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _ ४० वी राज्यस्तरीय सब ज्युनियर बाॅलबॅडमिटंन स्पर्धा वसमत (हिंगोली) येथे संपन्न झाल्या. सदर स्पर्धेतून ८ ते १२ जानेवारी २०२२ या कालावधीत राजेम-श्रीकाकुलम, आंध्र प्रदेश येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे साठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा येथील पब्लिक स्कूलचे विद्यार्थी उमेश सांगळे व भावेश सूर्यवंशी ह्या खेळाडूंची निवड झाली. नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन संघातील अष्टपैलू खेळाडू उमेश सांगळे याची मुंबई संघातून तर भावेश सूर्यवंशी याची महाराष्ट्र संघातून निवड समिती सदस्यांनी निवड केली. राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन असोसिएशन अध्यक्ष संजय आहेर, सचिव तुषार देवरे व क्रीडा मार्गदर्शक सुनिल देवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.  देशपातळीवर निवड झालेल्या खेळाडूंचे जि. प.सदस्या  नूतनताई आहेर, गटविकास अधिकारी राजेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव, प्राचार्य के. डी. पाटील व सर्व शिक्षक  तसेच माजी शिक्षक व माजी विद्यार्थी संघटना पदाधिकारी , नाशिक ग्रामीण बाॅलबॅडमिटंन संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here