June 27, 2022

एकोनावीस दिवसा पासून एस टी चे चाक थांबलेलेच ,खाजगी वाहतूक करणाऱ्या चालकांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी करावी कारवाई _ मागणी

1 min read

भारत पवार , मुख्य संपादक ,9158417131

नाशिक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज __ खास प्रतिनिधी _ गेल्या १९ दिवसां पासून एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी राज्य व्यापी सुरू असलेला संप आणि उपोषण यामुळे एस टी चे चाक पूर्णतः रुसले असून १९ दिवसांपासून तोडगा निघू न शकल्याने उपोषणाची धार तीव्र होते की काय ?असा सवाल प्रवाशांना पडला आहे.संधी मिळते म्हणून हात धुऊन घेणे आणि लुटत राहणे असा प्रकार जिल्ह्यात सर्वत्र चालू आहे. एस टी वाहतूक बंद म्हणून खाजगी वाहतूक करणारे चालक प्रवाश्यांना सर्रास पणे लुटू लागले आहेत.काही ठिकाणी डबल तर काही ठिकाणी तिप्पट भाडे आकारणी करून खाजगी वाहतूक सुरू आहे.त्यामुळे गरीब आणि सर्व सामान्य प्रवासी नाडला जात असून खाजगी वाहतूक करणाऱ्या चालकांवर त्या त्या विभागातील आरटीओ अधिकाऱ्यांनी त्वरित दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी संतप्त प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे. आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी नाशिक येथील कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सांगितले की योग्य असतील तरच मागण्या कराव्यात कारण राज्य सरकारची आर्थिक स्थिती गंभीर बनली आहे.मागण्या मान्य करणाऱ्यांनीही मागण्यांची भावना समजून घ्यावी मागण्या मान्य करण्या साठी तुटेल एवढ ताणू नका असे ही शरद पवार यांनी राज्य सरकारला सल्ला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.