मालेगाव बंद परिणाम:परिस्थिती नियंत्रणात पण कितीही डोळ्यात तेल घातले तरीही बंदला हिंसक वळण जमावाचा पोलिसांवर दगडफेक ,अफवांवर विश्वास ठेवू नका _ जिल्हाधिकारी

0
11

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , भारत पवार ,मुख्य संपादक _ त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वापरलेले अपशब्द मुस्लिम समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ ऑल इंडिया मुन्नी जमेतुल उलमा व रजा अकॅडमी तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला मालेगाव महानगरात हिंसक वळण लागले बंदचे आवाहन करणाऱ्या जमावाने सुरवातीला बसस्थानका समोरील सहारा हॉस्पिटल जवळील चहा टपरी, हॉटेल व बस स्थानक परिसरात दगड फेक करण्यास सुरुवात केली.पोलिस घटनास्थळी दाखल होताच पोलिस आणि जमाव समोरा समोर येताच जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली यात सात ते आठ जण किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. जमावास पांगवण्या साठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला मात्र मालेगावच्या पूर्व भागात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्यांवर आळा घालावा, हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी ह्या मागण्यांसाठी शुक्रवारी( ता.12) रोजी मालेगावी बंद पुकारण्यात आला होता. शहरातील पूर्व भागातील पावरलूम, बाजारपेठा, रिक्षा , बिफ आणि भाजीपाला विक्री बंद होती.घटनास्थळी पोलिस बंदोबस्तासाठी हजर असताना जमाव व पोलिस आमने सामने येताच जमावातील आक्रमक तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे शहरात अफवा पसरू लागल्या लागलीच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान मालेगावची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.बंद पुकारण्यात आल्याने नागरिकात मोठी घबराट निर्माण झाली होती याबाबत क स मा दे टाइम्स   ”  महाराष्ट्र न्यूज “ने बंद बाबत परिसरातील माहिती जाणून घेतली असता मुस्लिम बहुल भागातील बहुतांशी व्यवहार सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली.जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील हे नाशिकहून मालेगावी दाखल झाले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे सचिन पाटील व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here