June 27, 2022

दो हंसो का जोडा बिछड जाता रे….प्रेमाची धुंदी ,नशा लग्नाची चढली.. युगुलांना वयाचा प्रश्न पडला,हॉटेल वेलकम चा सहारा घेतला ,तिथेच मृत्यूचा गेम शिजला ..

1 min read

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ भारत पवार _ नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील घटनेची चर्चा जिल्हाभर होत आहे.देवळा शहरात नुकताच धक्कादायक प्रकार घडला असून व्हॉट्स अप चे स्टेटस मुळे उघडकीस आला.किशोर वयातील प्रेमी युगुलानी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.देवळा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने व्हॉटसअप वरती स्टेटस ठेवले सदर स्टेटस प्रेमाची धुंदी चढलेल्या प्रेम विरच्या मित्रांनी बघून ताबडतोब हॉटेल वेलकम गाठून याबाबतची माहिती हॉटेल चालकांना दिली.व त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवून त्यांचा जीव वाचविण्यासाठी तातडीने प्रयत्न केला.मात्र पुढील उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.                        याबाबत सविस्तर वृत्त असे प्रेमाची धुंदी व लग्नाची नशा चढलेले प्रेमी युगुल पैकी युवक( १८ ) वर्ष तर युवती ( १७) वर्षाची आहे.मुलगी फुले माळवाडी तर मुलगा हांडवा शिवारातील असून दोघांची ओळख संगणकाचे प्रशिक्षण घेत असताना झाली.ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन भेटी गाठी होत गेल्या त्यामुळे प्रेम अधिकच घट्ट होत गेले दोघांनी आयुष्य भर सोबत राहण्याचा व लग्न करण्याचा आणा_ भाका घेतल्या परंतु घरचे लग्नास संमती देतील की नाही , गावातील लोक विरोध करतील ह्या विचाराने नैराश्य येऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ते आत्महत्येचे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. प्रेम वीरांनी देवळा शहरातील हॉटेल वेलकम मध्ये रूम भाड्याने घेतली रूम मध्येच व्हॉटसअप ला आत्महत्या करतोय असे स्टेटस ठेवले आणि शेती साठी वापरले जाणारे तन नाशक विषारी औषध प्राशन करून दोघांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला परंतु युवकाच्या मित्रांनी स्टेटस बघून ताबडतोब हॉटेल गाठले .घडलेला प्रकार पोलिसानं पर्यंत गेला.घडलेल्या प्रकारामुळे हॉटेल व्यवस्थापक व प्रेमी युगुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.शासन नियमा नुसार कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही हॉटेल / लॉज प्रवेश देण्यापूर्वी  त्यांच्या जवळील आधार कार्ड व सामानाची तपासणी करणे अनिवार्य आहे.तसेच सदर व्यक्तीची नोंदणी हॉटेलवर रिसेप्शनमध्ये असणाऱ्या नोंद वहीत करणे गरजेचे आहे.परंतु अशा कोणत्याही प्रकारची नोंद व कागद पत्रांची मागणी केली नसल्याने शासकीय आदेशाचे उल्लंघन केले असून हॉटेल मॅनेजर दीपक सुभाष अहिरे रा.चिराई ( बागलाण ) यांच्यावर पोलीस नाईक रामदास गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय आदेशाचे उल्लंघन व आत्महत्येस सहाय्य केल्या बद्दल आणि युगुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला मुळे भा द वी कलम 309 , 114 , 188 नुसार देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास भोज यांचे मार्गर्शनाखाली पो.ना. गवळी करत आहेत.                         तर ” दो हंसो का जोडा बिछड जाता रे …” अशी म्हणण्याची नामुष्की ला देवळा तालुक्यासह माळवाडी व फुले माळवाडी गावात उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.