हिंगोलीत छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आमदारा कडून विटंबना ,सर्वत्र संतापाची लाट
1 min read
मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वसमत मतदार संघाचे आमदार नवघरे यांनी हिंगोली येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वावर बसून आणि दोघं पाय महाराजांच्या पुतळ्यास खेटून पुष्पहार अर्पण केला पुतळ्यास पाय लावणे हि विटंबना च असून त्यामुळे महाराष्ट्रातील जनेत संताप व्यक्त केला जात असून ह्या घटनेचा निषेध ही केला जात आहे. जनतेच्या जीवावर आमदार बनून खुशीत केळ खाणारा आमदार स्वतःस शिवाजी महाराजांपेक्षा खूपच मोठा समजत असेल तर हा त्यांचा भ्रम असून याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब या आमदारानी केलेल्या कर्तुत्वा बाबत काय भूमिका घेतात ? की घोड चूक करणाऱ्या आमदारास अभय देतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.तर त्या ठिकाणी सर्वच होते पण माझा एकट्याचाच पाय तिथे लावल्याच दाखवलं जातंय जर मी कुठे चुकलो असेन तर त्यासाठी माफी मागतो माझी यात कुठे चूक नाही असेही मी मानतो अशी प्रतिक्रीया नवघरे यांनी पत्रकारांना दिली.
