June 27, 2022

जिल्ह्याच्या राजकारणाला ” सोनेरी ” मुकुट घालणारा आणि देवळा तालुक्याच्या विकासाला ” वैभव ” प्राप्त करून देणारा गतिशील नेता _ केदा आहेर

1 min read

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ भारत पवार , मो.9158417131 _ राजकारण करावे त्यानेच जो जनतेच्या मध्यात राहुन ,जमिनीवर पाय ठेऊन आणि जनतेशी नाळ घट्ट पकडून ठेवणाऱ्या नेत्याने करावे.नाहीतर नाही चांगले करता येत तर किमान हवेत तरी उडान घेऊ नये.आहेत असे आणि असतातच मग त्यांचे काय होते ? हे सगळ्यांना ठाऊक आहे. माझा सांगायचा हेतू असा की , नाशिक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष पदी केदा आहेर उर्फ नाना यांची निवड होताच राजकारणातील राजकीय दिशा ही एका चांगल्या वळणावर येत आहे.कारण केदा आहेर यांना राजकारणातील बाळ कडू अगदी लहान पणापासून घरातून मिळालेले आहे.आणि हे मी नानाच्या अगदी जवळून अनुभवले आहे.आणि अनुभवत आहे . केदा नाना यांची जनहिता साठी विकास कामे करण्याची हातोटी अगदी विलक्षण तर आहेच त्याच बरोबर जिल्ह्यातील राजकारणातील जम अगदी विलक्षणीय आहे.त्यांचा मित भाषीपणा ,कितीही कामाचे टेन्शन वा ताण असो कायम हसतमुख सामोरे जाणे आणि जनतेत मिसळणारा नेता म्हणजे केदानाना अशी ख्याती आहे. ज्या वेळी देवळा नगर पंचायत अस्तित्वात आली त्या वेळी आमच्या वहिनी सौ.धनश्री केदा आहेर ह्या प्रथम नगराध्यक्ष झाल्या. आणि देवळा शहरातील बकाल पणा जाण्याची ही एक नामी संधी प्राप्त झाली.कारण धनश्री वहिनी ह्या अभ्यासू आणि आणि बंधू केदानाना यांची विकास काम करून घेण्याची लकब आणि राजकारणातील पकड जरी आहे ती अगदी पकड राहुन चालत नाही तर ती ” मजबूत ” असावी लागते.तशी ती मजबूत पकड नानांनी अगदी घट्ट केल्याने देवळा तालुका विकासाची ” कात ” टाकतांना अख्खा देवळा तालुक्यातील जनता पहात आहे.त्यात देवळा आणि चांदवड विधानसभा मतदासंघातील कामाची घोडदौड अगदी जोरदार पने चालवत आहेत.ते आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांचे जनविकासासाठी चे नेतृत्व चांदवड _ देवळा तालुक्या साठी अनमोल ठरत आहे.अशातच देवळा शहरास विकासाच्या गती कडे नेणारे  तरुण नेतृत्व म्हणजे अतुल अशोक पवार हे देवळा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती म्हणून धुरा सांभाळत आहेत.तर जोडीस असलेले पाणीदार नेतृत्व देवळा नगरपंचायतीचे अध्यक्ष तसेच प्रशासकीय आणि विकासाची गती घेणारे असे मुख्याधिकारी संदीप भोळे लाभल्या मुळे देवळा योग्य नेतृत्वाची धुरा घेऊन जाणारे केदानाना आहेर असा दुग्ध शर्करा योग लाभल्याने देवळा शहरास ” मनमोहक वैभव ” प्राप्त झाले आहे.हे वैभव देवळा तालुक्यातील च नव्हे तर जिल्ह्यातील जनतेस हेवा वाटावा असे भव्य दिव्य ” शिव स्मारक ” नानांच्या गतिशिल व विकसनशील नेतृत्वामुळे प्राप्त झाले आहे .रात्रीच्या वेळा ह्या स्मारकाभोवती आणि पूर्ण देवळा शहर हाय मास्ट लाईट मुळे नागरिकांचे मन वेधून घेत असतात.देवळा शहरातील सर्व व्यावसायिक दुकाने नानांच्या संकल्पनेतून नवीन तयार करण्यात आले असून त्यामुळे देवळा _ सटाणा रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून त्याच बरोबर वाहतूक व्यवस्था मोकळ्या हवेत चालविले जाते आहे.म्हणूनच केदानानांचे नेतृत्व मनमोहक ठरत असून जिल्ह्याच्या राजकारणात ” सोनेरी मुकुट ” घातल्या शिवाय केदानाना स्वस्थ बसणार नाहीत.हे तितकेच सत्य आहे.                                                                      __ भारत पवार , मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.