कला शिक्षक भारत पवार यांना मिळाला राष्ट्रीय ” शिक्षा रत्न ” पुरस्कार ! चेअरमन प्रा.हितेंद्र आहेर यांनी केला सत्कार !!

0
13

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : शांताराम पवार _ देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयाचे कला शिक्षक भारत रंगनाथ पवार यांना नुकताच नॅशनल लेव्हल भारत ज्योती गुरु सन्मान  राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार मिळाल्याने

देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व प्राचार्य   आदरणीय हितेंद्र आहेर(बापूसाहेब) यांनी   सचिव आदरणीय गंगाधर मामा शिरसाठ यांच्या उपस्थित सत्कार केला.यावेळी  जिजामाताकन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ.प्रतिभा सागर मॅडम,मुख्याध्यापक डी.ई. आहेर सर,पर्यवेक्षक .ठोके सर,आहेर सर,सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थीच्या यांनीही उपस्थित राहून त्यांच्या  वतीने भारत पवार सर यांचा सन्मान करण्यात आला. आदरणीय चेअरमन हितेंद्र बापू आहेर व गंगाधर मामा शिरसाठ यांच्या आशीर्वादाने व सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्या सर्वांच्या प्रेरणेने व सहकार्यामुळे

मला हे यश प्राप्त झाले असून आपणा सर्वांचे मी  आभार व्यक्त करतो असे भारत पवार यांनी सत्कार समयी आभार व्यक्त करताना मनोगत व्यक्त केले . विधान परिषदेचे शिक्षक आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही चित्रकार भारत पवार सर यांचे अभिनंदन केले असून तसे पवार यांना आमदार तांबे यांनी पत्र सुद्धा दिलेआहे. 🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here