पितृ पक्षास सर्वत्र शानदार सुरुवात

0
10

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ महाराष्ट्रात पितृ पक्षास सर्वत्र शानदार सुरुवात झाली असून नाव पितरांचे गाव मात्र मनमुराद खवय्यांचे असे चित्र सर्वत्र दिसत आहे. सप्टेंबर महिना म्हटला म्हणजे अनेक सण,उत्सव साजरे केले जातात.ह्या बैलपोळा सण झाल्यानंतर अनेक सण उत्सवांना सुरुवात होते. या महिन्याच्या मराठी भाद्रपद महिन्यातील गणपती उत्सव  झाल्यानंतर महाराष्ट्रात ह्या पितृ पंधरवड्यात उत्साहाने पूर्वजांना जेऊ घालण्याचे काम जोरदार चालते आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा ,कळवण , सटाणा मालेगाव ,नांदगाव,चांदवड,निफाड तालुक्यात जोरदार पणे पितृ पंधरवाडा साजरा केला जात आहे.  हि अंधश्रद्धा फार काळापासून चालत आलेली आहे. पितृ पक्षात अनेक मिक्स भाज्या एकत्र करून त्यांची भाजी बनवली जाते.तसेच गव्हाची खीर ,पोळी यासारखे अनेक पदार्थ तयार करून पूर्वजांना जेऊ घातले जाते.यावेळी कावळ्यांना वरील सर्व नैवेद्य दिले जाते. त्या नैवेद्यास कावळ्याने स्पर्श केला तर आपले पूर्वज जेवले आपणास पुण्य लाभले असा काहीसा समज असून खरेतर आपणच खवय्ये येथेच्छ भोजनाचा आस्वाद घेत असतो.आणि तृप्त होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here