डॉक्टर नर्सेस यांचे कार्य महान आम्हास आहे अभिमान _ एच ए एल महाप्रबंधक _ दीपक सिंघल , देव तारी त्याला कोण मारी… एच ए एल हॉस्पिटलच्या अनिता पवार, अनिता चव्हाण, माधुरी चीचे सिस्टर्स ठरल्या ” कोरोना योद्धा” मानकरी

0
13

40 हजार च्या पुढील वाचक संख्या असलेले परखड, दमदार लेखणी  महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या  मन पसंतीचे निर्भिड व फास्ट ” महाराष्ट्र न्यूज ” वेब पोर्टल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा.तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा.. संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक/संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो. 9158417131

ओझर टाऊनशिप : महाराष्ट्र न्यूज ,भारत पवार _ नाशिक जिल्ह्यातील ओझर टाऊनशिप येथील एच ए एल स्टेडियम वरती स्वातंत्र्यदिनानिमित्त एच ए एल नाशिक विभागाचे महाप्रबंधक दीपक सिंगल यांचे शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी ओझर एच ए एल चे अनेक विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, विविध शॉपचे प्रबंधक यांसह युनियन पदाधिकारी, एच अे ई डब्ल्यू आर सी चे पदाधिकारी आणि एच ए एल हॉस्पिटल चे सी ओ एम एस डॉक्टर अनिरुद्ध पाटील आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाप्रबंधक दिपक सिंगल (ए एम डी ), महाप्रबंधक चतुर्वेदी (ए ओ डी ), सी ओ पी पालवे, महाप्रबंधक भोये ( ए यु आर डी सी ) आधी अधिकाऱ्यांच्या हस्ते विविध मान्यवर कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. करुणा महामारी ने जगात थैमान घातले असताना देशातील लाखो जणांचा बळी कोरोना महामारी ने घेतला असे असताना महाराष्ट्रात सुद्धा कोरोना महामारी ने उग्ररूप धारण केले होते यात नाशिक जिल्ह्यात कोरोना ने कहर च केला होता तरीसुद्धा बऱ्याच अंशी कोरोना महामारी वर आपल्या जिल्ह्याने मात केली ती डॉकटर , नर्सेस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी यांच्यामुळेच .आपल्या एच ए एल हॉस्पिटलचे डॉक्टर , नर्सेस व कर्मचारी यांनी उत्कृष्ट कार्य केले. कोरोना काळात आमच्या नर्सेस नी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ,स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णास ट्रीटमेंट देणे आणि कोरोना रुग्णाचा जीव वाचविणे म्हणजे हे कार्य महान असून याचा आम्हास अभिमान आहे असे गौरवोद्गार महाप्रबंधक दीपक सिंगल यांनी यावेळी काढले. कोरोना महामारी रोगा पासून रुग्णाचा जीव वाचविणे हे महान कार्य करणारे डॉक्टर्स आणि नर्सेस एक प्रकारे देवाचे रूपच मानले पाहिजे म्हणूनच म्हणावेसे वाटते देव तारी त्याला कोण मारी ..!अशा अर्थाने उत्कृष्ट महान कार्य करून रुग्णांना चांगलं करून अर्थात देव अवतारी एच ए एल हॉस्पिटल्स चे नर्सेस अनिता पवार , अनिता चव्हाण आणि माधुरी चीचे ठरल्या ” कोरोना योद्धा ” मानकरी .आपल्या कर्तव्यात कसूर न करता सलग आठ तास पी पी ई किट अंगात परिधान करून रुग्णावरती उपचार करणे यावेळी अंगातून घामाच्या धारा चालणे ,कोरड पडणे असा त्रास नर्सेसना सोसावा लागला तरीही कुठल्याही प्रकारे त्यांनी त्यांच्या कामात , त्यांच्या कार्यात कसूर न करता रुग्णाचा जीव वाचविणे हे खूप महान कार्य असून अभिमानास्पद बाब आहे असे महाप्रबंधक चतुर्वेदी यांनी यावेळी सांगितले. तर महाप्रबंधक दीपक सिंगल , महाप्रबंधक चतुर्वेदी , महाप्रबंधक भोये , सी ओ पी पालवे  यांच्या शुभ हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व ट्रॉफी घेताना सिस्टर अनिता पवार ,सिस्टर अनिता चव्हाण ,सिस्टर माधुरी चीचे व मनोहर खालकर यांना स्वातंत्र्यदिनी प्रदान करण्यात आले. यावेळी एच ए एल सिक्युरिटी गार्ड चे प्रमुख आनंदकुमार , सुनील राऊत, डॉक्टर पारीख, विलास केदारे आदी अधिकाऱ्यांनी कौतुक करून कोरोना योद्धा म्हणून पात्र ठरलेले पवार आणि चव्हाण सिस्टर यांचे अभिनंदन केले. तर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ना.दादा साहेब भुसे , सचिव तथा मालेगाव शिव सेना प्रमुख रामा भाऊ मिस्त्री ,आर.पी.आय. नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी लोंढे ,आर.पी.आय .जिल्हा नेते शांताराम पवार , ब्राह्मणगाव उपसरपंच तथा आर.पी.आय.बागलाण तालुका अध्यक्ष बापूराज खरे , देवळा तालुका आरपीआय प्रमुख कैलास पवार आदींनी अनिता पवार यांचे अभिनंदन केले असून  एचएएल हॉस्पिटलचे ओमेगा उजागरे ,कोकिळा सिस्टर ,शीतल गायकवाड आदींसह अनेक सिस्टर्स व कर्मचाऱ्यांनी  अनिता चव्हाण , अनिता पवार, माधुरी चिचे , मनोहर खालकर यांचे कौतुक करून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here